माणिकगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:28 AM2021-03-26T04:28:08+5:302021-03-26T04:28:08+5:30

जिवती : तालुक्यातील माणिकगड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. याठिकाणी परराज्यातील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत आहे. ...

Crowd of tourists at Manikgad fort | माणिकगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी

माणिकगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी

googlenewsNext

जिवती : तालुक्यातील माणिकगड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. याठिकाणी परराज्यातील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत आहे. परिसरालगत असलेल्या विष्णू मंदिर, शंकर देव मंदिर, बुद्ध लेणी, अंमलनाला धरण येथेही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत आहे.

भारोसा घाटावर पूलाची निर्मिती करा

नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील भारोसा घाटावरुन तीर्थक्षेत्र वढा व जुगादला जाण्यासाठी पूलांची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. याठिकाणी मुलाची निर्मिती झाल्यास चंद्रपूर, कोरपना, वणी तालुक्यातील गावातील नागरिकांना जाण्या- येण्यासाठी सोयीचे होईल. तसेच भाविकांना कार्तिक पौर्णिमा व शिवरात्री उत्सवाला भाग घेण्यासाठी सोयीचे होईल. या पुलाच्या माध्यमातून वेळ व आर्थिक बचत होणार असल्याने पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रवासी निवारा बांधण्याची मागणी

चिमूर : शंकरपूर, ब्रह्मपुरी, कान्पा येथे जाण्यासाठी फाट्यावर यावे लागते. या फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने या परिसरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना रस्त्यात राहून बसची वाट बघावी लागते. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी निवाऱ्याची मागणी होत आहे.

अल्ट्राटेक चौकात गतिरोधक उभारा

गडचांदूर : गडचांदूर शहरातून राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. या मार्गावरुन दिवसरात्र वाहतूक सुरू असते. मात्र गतिरोधक नसल्याने येथे अपघात होत आहेत. या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक, संविधान चौक व बाबुराव शेडमाके चौक गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालविली जातात. यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत.

जिवती आरोग्य केंद्राला डाॅक्टर मिळणार

जिवती : येथील आरोग्य केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला होता. आता लवकरच रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीने निवेदन दिले होते. जिवती तालुका अध्यक्ष मारोती पुरी, सचिव गोविंद गोरे, सहसंयोजक सुनील राठोड, बाबू पवार आदी कार्यकर्त्यांनी रुग्णाल कायमस्वरूपी डॉक्टर देण्याची मागणी केली होती. रुग्णालयात कायस्वरूपी डॉक्टर मिळणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

वेतन आयोगाची थकबाकी द्यावी

चंद्रपूर : मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहावा वेतन आयोग पाच वर्ष उशिराने लागू करण्यात आला. दरम्यान या कालखंडातील थकबाकी कामगारांना अद्याप देण्यात आली नाही, असा आरोप प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केला. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना पूर्वी वर्षातून चार महिने काम मिळत होते. आता ते एक महिन्यावर आले. सरकारच्या धोरणामुळे या वर्षात फवारणीचे कामच सुरू झाले नाही. राज्यातील फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी ४ कोटी ५ लाख ५९ हजार आहे. परंतु, शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

Web Title: Crowd of tourists at Manikgad fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.