पर्यटकांची गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:25 AM2021-03-07T04:25:46+5:302021-03-07T04:25:46+5:30
भारोसा घाटावर पुलाची निर्मिती करा कोरपना : तालुक्यातील भारोसा घाटावरून तीर्थक्षेत्र वढा व जुगादला जाण्यासाठी पुलांची निर्मिती करावी, ...
भारोसा घाटावर पुलाची निर्मिती करा
कोरपना : तालुक्यातील भारोसा घाटावरून तीर्थक्षेत्र वढा व जुगादला जाण्यासाठी पुलांची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. याठिकाणी मुलाची निर्मिती झाल्यास चंद्रपूर, कोरपना, वणी तालुक्यातील गावातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी सोयीचे होईल. तसेच भाविकांना कार्तिक पौर्णिमा व शिवरात्री उत्सवाला भाग घेण्यासाठी सोयीचे होईल. या पुलाच्या माध्यमातून वेळ व आर्थिक बचत होणार असल्याने पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.
गतिरोधकाअभावी अपघाताची शक्यता
कोरपना : राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर परिसरात या मार्गावरून दिवसरात्र वाहतूक सुरू असते. मात्र गतिरोधक नसल्याने येथे अपघात होण्याची शक्यता आहे. या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक, संविधान चौक व बाबुराव शेडमाके चौकामध्ये गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालविली जातात.