पाच हजार एकरवर करडई पिकाची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:55+5:302021-09-23T04:30:55+5:30
शेतकऱ्यांना करडई लागवड प्रोत्साहन म्हणून प्रतिएकर २२,०० रुपये निविष्ठेकरिता मिळणार आहेत. यामध्ये आपल्या गावातील गट, कंपनी व वैयक्तिक शेतकऱ्यांनी ...
शेतकऱ्यांना करडई लागवड प्रोत्साहन म्हणून प्रतिएकर २२,०० रुपये निविष्ठेकरिता मिळणार आहेत. यामध्ये आपल्या गावातील गट, कंपनी व वैयक्तिक शेतकऱ्यांनी क्लस्टर तयार करून लागवड करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी महाज्योती डॉट ओरजी डॉट ईन या लिंकवर बियाण्यांकरिता नोंदणी करावी. जिल्ह्यामध्ये करडई तेलाची चांगली मागणी असून, आरोग्यासाठी करडई तेलाचे वेगळे महत्त्व आहे. करडई पिकाचे वन्य प्राण्यांपासून नुकसान होत नाही, तसेच या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो. जिल्ह्यात भात तसेच सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर कमीत कमी पाण्यावर येणारे हे पीक असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करडई पिकाची लागवड करावी.
बॉक्स
संस्थेतर्फे खरेदीची हमी
अर्जदार शेतकऱ्यांनी किमान १ एकर क्षेत्रावर पेरणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. त्यासोबतच करडई पिकाची खरेदी करण्याची हमी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत राहील. अधिक माहितीकरिता शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, आत्मा विभागाचे एटीएम व बीटीएम यांच्याकडे प्रत्यक्ष माहिती जाणून घ्यावी किंवा महाज्योतीचे समन्वयक पचारे यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी कळविले आहे.