वरोऱ्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील आधारवड हरवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:29 AM2021-05-11T04:29:10+5:302021-05-11T04:29:10+5:30

वरोरा : वरोरा शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्त्व डॉ. विनायक वामन वझे यांचे शनिवारी दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र आघाताने ...

The cultural base of Warora lost its base | वरोऱ्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील आधारवड हरवला

वरोऱ्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील आधारवड हरवला

googlenewsNext

वरोरा : वरोरा शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्त्व डॉ. विनायक वामन वझे यांचे शनिवारी दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र आघाताने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

वरोरा शहरातील संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्राचे आधारवड असलेले डॉ. वझे हे वरोराच्या पंचक्रोशीत अनेक ललित कला संस्थांचे पितृतुल्य आधारवड होते. त्यांनी शहरात संगीत कलानिकेतन संस्थेची स्थापना केली. अनेक वर्षे पं. भातखंडे आणि पं. पलुस्कर संगीत महोत्सव त्यांनी हिरीरीने राबविला. प्रसिद्ध संगीतकार शंकर-जयकिशन यांचे ते सहाध्यायी होते. पैगाम या सामाजिक आणि साहित्यिक संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. क्रिकेट या खेळाची त्यांना आवड होती. रणजी ट्रॉफीच्या निवड समितीचे ते सदस्यही होते. त्यांच्या निधनाने सामाजिक, कला आणि वैद्यकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात चार बहिणी, मुलगा अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर, स्नुषा स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ मीरा, दोन मुली, जावई, नातवंडे, मित्र आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. रविवारी सकाळी त्यांच्यावर स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खा. बाळू धानोरकर यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.

Web Title: The cultural base of Warora lost its base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.