चंद्रपुरात बोगस डॉक्टरांवर वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:16 PM2018-07-25T23:16:51+5:302018-07-25T23:17:21+5:30

ग्रामीण भागासारखे आता चंद्रपुरातही अनेक बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. अशा बोगस डॉक्टरांवर मनपाने करडी नजर ठेवली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मंगळवारी बंगाली कॅम्पमधील श्यामनगर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरावर कारवाई केली.

Curfew in Bogra doctors at Chandrapur | चंद्रपुरात बोगस डॉक्टरांवर वक्रदृष्टी

चंद्रपुरात बोगस डॉक्टरांवर वक्रदृष्टी

Next
ठळक मुद्देमनपाचे धाडसत्र : बंगाली कॅम्पमध्येही कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामीण भागासारखे आता चंद्रपुरातही अनेक बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. अशा बोगस डॉक्टरांवर मनपाने करडी नजर ठेवली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मंगळवारी बंगाली कॅम्पमधील श्यामनगर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरावर कारवाई केली.
खुशाल रामदास खेरा असे या बोगस डॉक्टराचे नाव आहे. चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. या बोगस डॉक्टरांबाबतच्या अनेक तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या आहेत. त्यातील तक्रारीची दखल घेत मनपाच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी बोगस डॉक्टर शोध मोहीम पथकासह शहरात धाडसत्र सुरू केले आहे. दरम्यान, मंगळवारी खेरा हॉस्पिटल श्यामनगर, बंगाली कॅम्प येथे सायंकाळी भेट दिली. तेथे खुशाल रामदास खेरा नावाचा व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करताना दिसून आला. सदर व्यवसायिकाने खेरा हॉस्पिटल नावाचा बोर्ड तेथे लावलेला होता. बोर्डवर डॉ. के. आर. खेरा, (बि.ए.एम.एस. (एमडी) ), मुंबई या पदव्यांचा उल्लेख आढळून आला. दवाखान्यात चौकशी केली असता व्यावसायिक जागेत आयुर्वेदिक औषधीचा वापर तसेच रुग्णांची तपासणी करीत असताना हा डॉक्टर आढळून आला. मात्र त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी वा नोंदणी प्रमाणपत्र आढळून आले नाही. सदर कारवाई मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अंजली आंबटकर, डॉ. जयश्री वाडे, सहायक पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, औषधी निरीक्षक श्रीकांत फुले यांनी केली.
डॉक्टर बारावीही उत्तीर्ण नाही
महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ (१) नुसार वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी राज्यात कार्यरत विविध वैद्यकीय परिषदांकडे वैद्यकीय व्यावसायिकाने नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सदर डॉक्टरला वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय शैक्षणिक अहर्ता तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणीचे प्रमाणपत्र याबाबत मागणी केली असता त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाद्वारे अधिकृत कोणतेही प्रमाणपत्र आढळून आले नाही. इतकेच नाही तर तो १२ वीसुद्धा पास नसल्याचे कळाले. चौकशी दरम्यान सदर व्यवसायिक आयुर्वेदिक औषधीचा वैद्यकीय व्यवसाय करतो, असे आढळून आले. चौकशीत दवाखान्यात आयुर्वेदिक औषधेही आढळून आली. रामनगर ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून खेरा याला अटक केली. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Curfew in Bogra doctors at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.