संचारबंदीने व्यावसायिक हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:28 AM2021-04-16T04:28:43+5:302021-04-16T04:28:43+5:30
शिवभोजन केंद्रांची संख्या वाढवा चंद्रपूर : कोरोना संकटामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद आहे. अशा वेळी सामान्य नागरिकांना नाहक ...
शिवभोजन केंद्रांची संख्या वाढवा
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद आहे. अशा वेळी सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने गावागावांत शिवभोजन केंद्र सुरू करावे, अशी मागणी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मोबाईलवर एसएमएस धडकले
चंद्रपूर : शासनाने संचारबंदी लागू करताच इंग्रजी शाळांच्या शिक्षकांनी पालकांच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून निकालाची तसेच फी भरण्याची तारीख वाढवून देत आता पुढील महिन्यातील तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे काही दिवस का होईना, पालकांना दिलासा मिळाला आहे.
बांधकाम व्यावसायिक अडचणीत
चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जात आहे. दरम्यान, संचारबंदीमुळे काही मजुरांनी आपल्या गावाला जाणे पसंत केले आहे. त्यामुळे या व्यावसायिकांकडे मजूर वर्गाचा तुटवडा आहे. त्यातच कामाच्या ठिकाणीच मजुरांच्या राहण्याची व्यवस्था करावयाची असल्याने काहींना ते शक्य नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले आहे.
परीक्षा नसली तरी पालकांची धावपळ
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षी पहिली ते नवव्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेताच उत्तीर्ण केले जाणार आहे. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक सत्रासाठी पालकांनी तयारी सुरू केले आहे. विशेषत: नवव्या तसेच एकराव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आता शिकवणी वर्ग शोधणे सुरू केले आहे.
स्वच्छतेअभावी नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा, तुकूम, वडगाव परिसरांतील काही चौकांमध्ये अस्वच्छता आहे. त्यामुळे याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.
आझाद बागेचे काम त्वरित करावे
चंद्रपूर : येथील आझाद बागेच्या सौंदर्यीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे सदर काम त्वरित करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, मागील लाॅकडाऊनपासून ही बाग नागरिकांसाठी बंदच आहे.
पुतळ्याचे सौंदर्यीकरण करावे
चंद्रपूर : शहरात विविध चौकांमध्ये महापुरुषांचे पुतळे आहे. मात्र या पुतळ्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
जनावरांमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे उभी राहत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, वरोरा नाका चौक अपघातग्रस्त चौक म्हणून ओळख आहे. या चौकातही मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.