लाॅकडाऊनच्या नावावर किराणा व्यावसायिकांकडून ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:14+5:302021-04-28T04:30:14+5:30

यांचा गैरफायदा घेत किराणा दुकानदार, खाद्य तेल विक्री करणाऱ्या एजन्सी व ठोक व्यापारी जास्तीचे दर आकारून ग्राहकांची सर्रास आर्थिक ...

Customer robbery from grocery stores in the name of lockdown | लाॅकडाऊनच्या नावावर किराणा व्यावसायिकांकडून ग्राहकांची लूट

लाॅकडाऊनच्या नावावर किराणा व्यावसायिकांकडून ग्राहकांची लूट

Next

यांचा गैरफायदा घेत किराणा दुकानदार, खाद्य तेल विक्री करणाऱ्या एजन्सी व ठोक व्यापारी जास्तीचे दर आकारून ग्राहकांची सर्रास आर्थिक लूट करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

खाद्य तेलासह साखर, गूळ, डाळ अशा अनेक वस्तूंचे भावदेखील वाढवून ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. प्रशासनातील अधिकारी मात्र यावेळी बघ्याची भूमिका घेत आहे.

लाॅकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने गोरगरिबांना जीवनावशक वस्तू जास्त दराने विकला जात आहे. किराणा मालाच्या भावाचे फलक दुकानासमोर लावण्यात यावे, असा नियम आहे. मात्र फलक लावण्यात येत नाही. किराणा व तेलासारख्या जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करण्यात येत आहे.

मोठे दुकानदार व एजन्सी मालक जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून लहान दुकानदारांना जास्त किमतीत मालाचा पुरवठा करीत असल्याने लहान किराणा विक्रेतेसुद्धा जादा भावाने विक्री करीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी शंकरपूर ग्रामचायतीचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.

Web Title: Customer robbery from grocery stores in the name of lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.