ग्राहकांनी अन्यायाविरुद्ध तक्रार करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:08 PM2018-02-16T23:08:38+5:302018-02-16T23:09:18+5:30
ग्राहकांनी उत्तम सेवा मिळाली नाही तर तातडीने तक्रार करावी, असे प्रतिपादन टेलिकॉमचे क्षेत्रीय सल्लागार श्रीनिवास गलनाली यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ग्राहकांनी उत्तम सेवा मिळाली नाही तर तातडीने तक्रार करावी, असे प्रतिपादन टेलिकॉमचे क्षेत्रीय सल्लागार श्रीनिवास गलनाली यांनी केले. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडियाच्या वतीने ग्राहक जागरुकता अभियानात ते बोलत होते. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे सी. एम. चानणमल, होदकासिया, वरिष्ठ संशोधन अधिकारी के. मुरलीधर उपस्थित होते.
क्षेत्रीय कार्यालयाची भूमिका, कार्यपद्धत तसेच दूरध्वनी ग्राहक संरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. घेतलेल्या पुढाकारांची माहिती दिली. दूरध्वनी सेवा पुरविणारे अधिकारी सरकारी व संस्थांचे कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील सदस्य तसेच स्वयंसेवा संस्थेच्या कर्तव्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मूल्याधारीत सेवा, तक्रार नोंद कार्यपद्धती टेरिफ ट्रायच्या नियमांवरही प्रकाश टाकण्यात आला.
गलगाली म्हणाले, सेवा घेणाºया व्यक्तीला ग्राहक दक्षता केंद्राशी संपर्क करावा लागतो. त्यानंतर तक्रार नोंदविली. त्या तक्रारीची विस्तारीत माहिती, तक्रार क्रमांक, दिनांक, वेळ तक्रार निवारण्यासाठी लागणारा वेळ ही माहिती एसएमसद्वारे ग्राहकाला दिली जाते. संबंधित ग्राहक तक्रार निवारणाबाबत समाधानी नसेल तर ती वरिष्ठ अधिकाºयांकडे दाद मागावी. ट्रायच्या संकेत स्थळावर ग्राहक दक्षता व संबधित अधिकाºयांचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत. ग्राहकाला त्याच दूरध्वनी क्रमाकांवर सेवा पुरविणारी कंपनी बदलायची असेल तर, नव्या क्रमाकांवर तक्रार करता येते. यासाठी संकेतांक क्रमांकाची मूदत दोन आठवड्यांपर्यंत राहिल. मूल्यवर्धित सेवा देताना सेवा पुरविणाऱ्या कंपनी ग्राहकांकडून दोनदा खात्री केली पाहिजे, असेही गलनाली यांनी सांगितले. चानलमल म्हणाले, ग्राहकाला नको असलेली सेवा सुरु झाल्यास ती बंद करण्यासाठी मोफत क्रमांकांची सुविधा कंपनीने दिली आहे. त्याचा संकेत क्रमांक १५५२३३ असा आहे. त्यावर ग्राहकांनी तक्रार दाखल करावी. यामध्ये प्रीपेड सेवेमध्ये ९० दिवसांपेक्षा कमी दिवस सेवेचा वापर नसल्यास कंपनी सेवा बंद करु शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय विविध फायद्यांविषयी कार्यशाळेत चर्चा घेण्यात आली. यावेळी ग्राहकांना माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.