सायबर गुन्ह्याबाबत कार्यशाळा
By admin | Published: July 23, 2015 12:49 AM2015-07-23T00:49:10+5:302015-07-23T00:49:10+5:30
इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने आयएमए सभागृह येथे लोकहितार्थ सायबर सेल चंद्रपूरच्या वतीने सायबर गुन्ह्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
चंद्रपूर : इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने आयएमए सभागृह येथे लोकहितार्थ सायबर सेल चंद्रपूरच्या वतीने सायबर गुन्ह्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
वाट्सअप, फेसबुक, गुगल, जीमेल, एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डचा वापर करताना घडणारे अनेक गुन्हे व त्याची आकडेवारी, चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेले गंभीर गुन्हे, ज्यामध्ये इंजीनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी व वकिलांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती या कार्यशाळेत सायबल सेलचे मुजावर अली, रोशन चांदेकर, प्रियंका बोथले यांनी दिली.
त्यामध्ये फेकबुक व वॉट्सअप वापरताना घ्यावयाची काळजी] जसे की सेटींगमध्ये जाऊन सेटींग बदलविणे, लग्न व साखरपुड्याचे वैयक्तिक छायाचित्र, अश्लील माहिती व फोटो तसेच धार्मिक भावना दुखवणारी माहिती फेसबुक व वॉट्सअप टाकल्यामुळे कशाप्रकारचे गंभीर गुन्हे सायबर सेलअंतर्गत घडले आहे. याची माहितीसुद्धा उपस्थितांना अनेक प्रत्याक्षिकाद्वारे देण्यात आली. एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डचा वापर करताना घ्यावयाची काळजी व घडलेल्या अनेक गुन्ह्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारून आपल्या शंकेचे निरसन केले.
या कार्यक्रमाला आयएमएचे अध्यक्ष डॉ. भुक्ते, सचिव डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. अनघा वाडेकर, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. प्रवीण पंत, डॉ. अनुप वासाडे, डॉ. भागवत, बंटी घाटे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पुर्ततेसाठी शाखा सचिव मनिष पळसोकर व अतुल तेलंग, राजेश गण्यारपवार, बंडू सोरडे, विनय कुलकर्णी, प्रांजल देशकर, प्रशांत वैरागडे, श्रीकांत बुरडकर आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)