सणासुदीतच सिलिंडरचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:34 AM2021-09-09T04:34:18+5:302021-09-09T04:34:18+5:30
महागाईने सर्वसामान्य माणसांचे जगणे अवघड केले आहे. कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले आहे. संसाराचा गाडा कसा हाकलावा, असा प्रश्न निर्माण ...
महागाईने सर्वसामान्य माणसांचे जगणे अवघड केले आहे. कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले आहे. संसाराचा गाडा कसा हाकलावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच दर आठ दिवसांनी सिलिंडरच्या किमतीत वाढ होऊ लागल्याने जनता त्रस्त झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला घरगुती सिलिंडरची किंमत ६९४ रुपये होती. फेब्रुवारीत ७१९ रुपये प्रतिसिलिंडर झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ८७६ रुपये झाली व पुन्हा सप्टेंबरमध्ये २५ रुपयांनी वाढ होऊन ९०१ रुपये किंमत झाली आहे. याच बरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. या सर्व दरवाढीचा परिणाम दिवाळीसारख्या सणाबरोबर आगामी गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आदी सणावर होणार आहे. सिलिंडर भाववाढ ग्रामीण भागातील ग्रामस्थांना परवडणारी नसल्याने त्यांना पुन्हा शेगडीवरून चुलीकडे धाव घ्यावी लागत आहे. या संदर्भात काही आंदोलन करण्यात आली आहे. पण त्याचा काहीच परिणाम न झाल्याने आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.