सिलिंडरचा भडका, घर जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:26 PM2019-07-16T23:26:14+5:302019-07-16T23:26:28+5:30

सिलिंडर गळतीमुळे गायत्री गुरुदेव नाकतोडे यांचे घर जळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चिखलगाव येथे घडली. या घटनेत एक लाखाचे संसारोपयोगी साहित्य खाक झाले.

Cylinders burst, house burnt | सिलिंडरचा भडका, घर जळाले

सिलिंडरचा भडका, घर जळाले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : सिलिंडर गळतीमुळे गायत्री गुरुदेव नाकतोडे यांचे घर जळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चिखलगाव येथे घडली. या घटनेत एक लाखाचे संसारोपयोगी साहित्य खाक झाले.
गायत्री नाकतोडे यांना उज्वला गॅस योजनेतंर्गत सिलिंडर मिळाला होता. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्वयंपाक करताना आगीचा भडगा उडाला. गावकऱ्यांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती गॅस वितरण कंपनी, पोलीस ठाणे व ब्रह्मपुरी नगर परिषद अग्निशमन दलाला देताच सर्वजण घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी नुकसानीचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Cylinders burst, house burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.