दादाजी खोब्रागडे यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:20 PM2018-06-11T23:20:29+5:302018-06-11T23:20:42+5:30

जिल्ह्याचे भूषण धान संशोधक, कृषी तज्ज्ञ दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधन कार्याचा सदैव गौरव व्हावा, यासाठी त्यांचे स्मारक व त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना दिली.

Dadaji Khobragade's memorial and research center will be set up | दादाजी खोब्रागडे यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारणार

दादाजी खोब्रागडे यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारणार

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : दादाजींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केली सांत्वना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : जिल्ह्याचे भूषण धान संशोधक, कृषी तज्ज्ञ दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधन कार्याचा सदैव गौरव व्हावा, यासाठी त्यांचे स्मारक व त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना दिली.
सोमवारी ना. अहीर यांनी एमएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांची नांदेड येथील निवासस्थानी भेट घेऊ न सांत्वन केले. ना. अहीर म्हणाले, दादाजींनी मोठमोठ्या संशोधकांना मागे टाकत धानाच्या नऊ वाणांचे संशोधन केले. दादाजींच्या कर्तृत्वाचा अभिमान जिल्ह्यासह राज्यातील धान उत्पादकांना होता. दादाजींचे हे संशोधन जागतिक स्तरावर पोहोचले. त्यांच्या संशोधनामुळे शेतकरी स्वयंपुर्णतेकडे वाटचाल करू शकला. या संशोधकाला जिल्हा मुकला. दादाजींच्या कुटुंबातील सदस्यांना रोजगार व शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही ना. अहीर यांनी दिले. यावेळी आ. कीर्तीकुमार भांगडिया, माजी आ. अतुल देशकर, चंद्रपूरचे उपमहापौर अनिल फुलझेले, राजेश मून, जि. प. सदस्य संजय गजपुरे, राहुल सराफ, एसडीओ काळे, उपसरपंच परेश शेंडे उपस्थित होते.

Web Title: Dadaji Khobragade's memorial and research center will be set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.