दादांच्या समाधीस्थळाने अड्याळ टेकडीच्या सौंदर्यात आणखी भर

By admin | Published: November 24, 2015 01:21 AM2015-11-24T01:21:52+5:302015-11-24T01:21:52+5:30

गीताचार्य तुकारामदादा यांना अड्याळ टेकडीवर ज्या ठिकाणी चिरशांती देण्यात आली, त्या ठिकाणी शेगाव येथील गजानन महाराज

Dada's place of worship is even more of the beauty of Adalal hill | दादांच्या समाधीस्थळाने अड्याळ टेकडीच्या सौंदर्यात आणखी भर

दादांच्या समाधीस्थळाने अड्याळ टेकडीच्या सौंदर्यात आणखी भर

Next

बांधकाम अंतिम टप्प्यात : शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टचा पुढाकार
घनश्याम नवघडे ल्ल नागभीड
गीताचार्य तुकारामदादा यांना अड्याळ टेकडीवर ज्या ठिकाणी चिरशांती देण्यात आली, त्या ठिकाणी शेगाव येथील गजानन महाराज ट्रस्टच्या वतीने समाधीस्थळाचे विलोभनीय बांधकाम सुरू आहे. या बांधकामाने अड्याळ टेकडीच्या सौंदर्यात आणखीच भर पडणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने गीताचार्य तुकारामदादा यांनी आपल्या साधनेसाठी अड्याळ टेकडीची निवड केली. या अड्याळ टेकडीवर त्यांनी अखंड १२ वर्ष मौन धारण करून साधणा केली. त्यानंतर ते लोकसेवेसाठी बाहेर पडले. संबंध महाराष्ट्रात व देशात त्यांचे समाजसेवेचे कार्य सुरू असताना अड्याळ टेकडीवरही त्यांनी विशेष लक्ष पुरविले. अड्याळ टेकडीवर त्यांनी स्वत:च्या कल्पनेतील सर्वभौम असे एक खेडे तर निर्माण केलेच, पण त्याचबरोबर अड्याळ टेकडीच्या पंचक्रोशीत असलेल्या खेड्यांना स्वावलंबनाची दीक्षा देण्याचे कार्यही अविरत केले. अशा या महान आणि आदर्श अशा समाजसेवकांनी ८ जून २००६ रोजी आपले इहलोकीचे कार्य कायमचे संपविले.
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी संबंध महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. अशाच मान्यवरांपैकी शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष शिवशंकर पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत शिवशंकर पाटील यांनी गीताचार्य तुकारामदादा आणि आपले काय नाते होते, हे सांगून ज्या ठिकाणी दादांना चिरशांती देण्यात आली, त्या ठिकाणी दादांच्या समाधीस्थळासाठी शेगाव संस्थान दोन कोटी रुपये खर्च करणार असल्याची ग्वाही दिली.
शिवशंकर पाटील यांच्या ग्वाहीनुसार दादांच्या समाधी स्थळाचे बांधकाम काही दिवसाअगोदर हाती घेण्यात आले. हे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. समाधीस्थळाचे संपूर्ण बांधकाम राजस्थानी पद्धतीचे असून बांधकामासाठी लागणारा दगड आणि कारागीर सुद्धा राजस्थानातूनच मागविण्यात आले आहेत. समाधीस्थळाच्या पूर्वेला विशाल असे जलाशय, लता वेली आणि विविध जातींच्या वृक्षांनी बहरलेली अड्याळ टेकडी आणि त्या टेकडीवर हे विलोभनीय बांधकाम त्यामुळे अड्याळ टेकडीचे सौंदर्य आणखीच खुलून दिसत आहे.

Web Title: Dada's place of worship is even more of the beauty of Adalal hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.