दालमिया सिमेंट कंपनीने वेज बोर्डप्रमाणे मजुरी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:01+5:302021-06-28T04:20:01+5:30

आवाळपूर : कोरपना तालुका हा सिमेंट कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यात पूर्ववत नव्यानेच सुरू झालेल्या दालमिया भारत सिमेंट उद्योगाने आणखी ...

Dalmia Cement Company should pay wages like Wage Board | दालमिया सिमेंट कंपनीने वेज बोर्डप्रमाणे मजुरी द्यावी

दालमिया सिमेंट कंपनीने वेज बोर्डप्रमाणे मजुरी द्यावी

आवाळपूर : कोरपना तालुका हा सिमेंट कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यात पूर्ववत नव्यानेच सुरू झालेल्या दालमिया भारत सिमेंट उद्योगाने आणखी भर पडली. परिसरातील नागरिकांना रोजगाररूपी उद्योग उभा झाला. मात्र परिसरातील नागरिकांच्या हाताला काम नाही. ज्यांना काम आहे, त्यांना व्यवस्थित रोजी नाही. असे हाल कामगाराचे होत असल्याने जिल्ह्यातील सिमेंट कामगार संघटनेने कामगाराचे शोषण व पिळवणूक थांबवून त्यांना वेज बोर्डप्रमाणे मजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.

पूर्वाश्रमीच्या मुरली सिमेंटचे अधिग्रहण भारतातील नामांकित दालमिया भारत सिमेंट या उद्योगाने केले. त्यामुळे मुरली सिमेंटच्या कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु दालमिया सिमेंट व्यवस्थापनाने उद्योग सुरू करूनही जुन्या स्थायी कामगारांना कामावर घेतले नाहीच, पण बाहेर प्रांतातून कामगार आणून त्यांना फक्त ३०० ते ३५० रु. रोजी देऊन कंत्राटदारामार्फत स्थायी स्वरूपाचेही काम करवून घेतल्या जात आहे. जेव्हा की जिल्ह्यातील इतर सिमेंट उद्योगातील स्थायी कामगारांना ३५ ते ४० हजार रु. प्रतिमाह तथा बोनस, राहण्यास वसाहतीत घरे, मेडिकल सुविधा व्यवस्थापनाद्वारे पुरविल्या जात आहेत.

सिमेंट लोडिंग विभागात इतर सिमेंट उद्योगातील काम करणाऱ्या कामगारांना वेज बोर्डनुसार १३५० रु. रोजी प्रति दिवस तथा इतर सुविधा देण्यात येत आहेत. पण दालमिया भारत सिमेंट उद्योगाने जुन्या मुरली सिमेंट उद्योगातील लोडिंग कामगारांना डावलून बाहेर प्रांतातून (झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश) नवीन कामगार आणून त्यांना फक्त ५०० रु. रोजी देऊन कायदे धाब्यावर बसवून त्यांचेही शोषण सुरू केलेले आहे. दालमिया सिमेंट उद्योगाने जुन्या स्थायी लोडिंग तथा ठेकेदारी काम करणाऱ्या कामगारांना कामावर रुजू करून घेण्यात यावे. लोडिंग विभागातील लोडर, पॅकर, ऑपरेटर व इतर कामगारांना सिमेंट वेजबोर्डनुसार १३५० रु. प्रति दिवस पगार देण्यात यावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

===Photopath===

270621\img-20210626-wa0027.jpg

===Caption===

शोषण होत असलेले कामगार एकत्र जमून आपल्या व्यथा मांडताना.

Web Title: Dalmia Cement Company should pay wages like Wage Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.