धरणे आंदोलनातून बेरोजगारीकडे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:28 AM2021-09-19T04:28:56+5:302021-09-19T04:28:56+5:30
बल्लारपूर : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशानुसार आणि माजी खासदार नरेश पुगलिया आणि युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ...
बल्लारपूर : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशानुसार आणि माजी खासदार नरेश पुगलिया आणि युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन गेडाम यांनी केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले.
आज केंद्र सरकार रोजगाराच्या मुद्द्यावर पूर्णपणे गप्प आहे. देशातील बेरोजगारीचा दर एका वर्षात २.४ टक्क्यांवरून १०.३ टक्क्यांवर गेला आहे. सरकार तरुणांना रोजगार देण्यात अपयशी ठरले आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. या देशात बेरोजगारीचे संकट आले आहे. म्हणून नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसने चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी युवक काँग्रेस महासचिव जुनैद सिद्दीकी, उपाध्यक्ष सिकंदर खान, अझर शेख तालुका अध्यक्ष बल्लारपूर, संदीप नक्षीने, काशी मेंगनवार, इब्बू सिद्दीकी, श्रीखांत गुजरकर, अमर वानखेडे, बुरिया बंधू, अक्षय पापुलवार, नाझीम भाई, सलीम भाई, अनिल, मुबीन शेख उपस्थित होते.
180921\img-20210918-wa0017.jpg
युवक काँग्रेसचे धरना प्रदर्शन