नागभीडात वर्षभरापूर्वीच्या रस्त्याचे "डॅमेज कंट्रोल"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:33 AM2021-08-25T04:33:18+5:302021-08-25T04:33:18+5:30
नागभीड : शहरात एक वर्षापूर्वीच शहरात बांधण्यात आलेल्या ''रस्त्यांचे डॅमेज कंट्रोल'' करणे सुरू करण्यात आले आहे. अचानक हाती घेण्यात ...
नागभीड : शहरात एक वर्षापूर्वीच शहरात बांधण्यात आलेल्या ''रस्त्यांचे डॅमेज कंट्रोल'' करणे सुरू करण्यात आले आहे. अचानक हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. कोणतीही मागणी नसताना रस्त्यांचे हे डॅमेज कंट्रोल करण्यामागे हेतू काय अशीही विचारणा होत आहे.
नगर परिषद स्थापन होण्यापूर्वी नागभीडच्या रस्त्यांची हालत अतिशय खस्ता होती. मात्र नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पदारूढ झालेल्या कार्यकारी मंडळाने रस्त्यांच्या निधीसाठी पाठपुरावा केला आणि काही दिवसांतच नागभीडच्या अंतर्गत रस्त्यांसाठी मोठा निधी मंजूर झाला. निधीस मंजुरी मिळताच धुमधडाक्यात भूमिपूजन करून काही दिवसातच या रस्त्यांचे कामही सुरू करण्यात आले. आता नागभीडकरांना सुंदर आणि चकचकीत रस्ते पाहायला मिळतील, अशी नागभीडकरांची अपेक्षा होती. मात्र शेवटपर्यंत ही अपेक्षाच राहिली. सुरू करण्यात आलेले हे कामच आता नागभीडकरांसाठी शाप ठरले आहे. कारण चार वर्षापासून सुरू करण्यात आलेले हे काम संपायचे नावच घेत नाही. आजही काही ठिकाणी रस्त्यांचे हे काम सुरू आहे.या रस्त्यांची बांधकाम यंत्रणा आणि कंत्राटदार यांच्यापुढे तर नगर परिषद प्रशासन आणि नागभीडकरांनी हात टेकले आहेत.या रस्त्यांच्या कामाबद्दल नागभीडमध्ये सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.मात्र त्याची खंत ना कंत्राटदारास आहे, ना बांधकाम यंत्रणेस आहे.
अशाही परिस्थितीत मागील वर्षी जनता शाळा, बँक आॕफ इंडियापासून सिनेमा टाॅकीज चौकापर्यंत या नागभीडच्या मुख्य रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र हा रस्ता वर्षभरातच उखडला. आता या रस्त्याचे संबंधित विभागाने डॅमेज कंट्रोल करणे सुरू केले आहे. सद्यस्थितीत जनता शाळा व बँक आॕफ इंडिया समोरून गेलेल्या रस्त्याचे डॅमेज कंट्रोल करण्याचे काम सुरू आहे. हे करताना संबधितांनी पुरेशी सावधानता न बाळगल्याने पहिल्याच दिवशी नवीन कामावरून वाहने चालविण्यात आली. या डॅमेज कंट्रोलविषयी चर्चा होत आहे.
240821\img_20210824_153757.jpg
रस्त्याचे सुरू असलेले डॕमेज कंट्रोल