‘त्या’ बांधकामामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:54 PM2018-04-06T23:54:33+5:302018-04-06T23:54:33+5:30

सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील माजी मालगुजारी (मामा) तलावाचे बांधकाम सुरु असून मायनरवरील आऊटलेट (मोरी बांधकाम) चे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले.

The 'damages' of farmers due to the 'construction' | ‘त्या’ बांधकामामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान

‘त्या’ बांधकामामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान

Next
ठळक मुद्देपाटबंधारे विभाग : कंत्राटदाराला अधिकाऱ्यांकडून उभय

लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील माजी मालगुजारी (मामा) तलावाचे बांधकाम सुरु असून मायनरवरील आऊटलेट (मोरी बांधकाम) चे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. दरम्यान, या प्रकरणी तक्रार केल्याने आऊटलेटच्या बाजूला लहान पाईप टाकले. नहराला दोन्ही बाजूने पाणी जाईल. परंतु ते आऊटलेट पूर्ण फोडून नवीन केल्यास शेतकऱ्यांना त्रास होणार नव्हता. संबंधित अभियंत्यांने कंत्राटदाराचे हित लक्षात घेऊन डागडुजी केली. यातून शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. त्यामुळे दुरूस्ती करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील पाच महिन्याप्ाांसून वासेरा येथील मामा तलावाचे बांधकाम पाठबंधारे विभागामार्फत सुरु आहे. त्यात तलावाचे पाळी व नहर दुरुस्ती तसेच आऊटलेटचे बांधकाम करण्यात आले. आऊटलेटचे बांधकाम हे भडगर मायनर, राजोली मायनर, वाकल मायनर येथे सुरु होते. अभियंतांनी त्या ठिकाणी स्वत: उपस्थित राहून काम सुरु करणे बंधनकारक होते. परंतु स्वत: हजर न राहता कंत्राटदारामार्फत मोजमाप (लेआऊट) करून कामे केले, असा आरोप होत आहे. आऊटलेटला मोठे पाईप वापरायचे होते. जेणेकरुन शेतकऱ्यांच्या शेतात सहजपणे जाऊ शकेल. परंतु लहान पाईपचा वापर करुन आऊटलेट बनविने, ही बाब शेतकऱ्यांचा लक्षात येताच अभियंता व कंत्राटदाराने आऊटलेटच्या बाजूला पुन्हा लहान पाईप लावून दिला.
हा पाईप लावल्याने शेतात पाणी बरोबर जाणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मामा तलावाचे काम या पद्धतीने कुठेच होत नाही, असा दावाही शेतकऱ्यांनी केला आहे.
काही शेतकºयांनी आऊटलेट (मोरीबांधकाम)चे बांधकाम फोडून नवीन आऊटलेट तयार करा, अशी मागणी केली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी बाजूच्या पाईपमधून पाणी जाईल. आऊटलेटऐवजी मोठे पाईप टाकावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
बांधकामाची चौकशी करून दुरूस्ती करावी
मामा तलावांमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मागील काही वर्षांपासून शेतीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने पीक वाया जात आहे. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही. निसर्गाच्या भरोशावरच या भागातील शेतकरी शेती करीत आहेत. त्यामुळे मामा तलावांची दुरूस्ती व पुनरूज्जीवन करणे गरजेचे होते. शासनाने या परिसरात कामे सुरू केली. काही कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, चुकीच्या पद्धतीने बांधकाम होत असल्याने पावसाळ्यात काहीच लाभ होणार नाही. त्यामुळे दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.

ग्रामस्थांची समिती गठित करूनच मामा तलावाचे काम करण्यात आले. त्यातील ४० टक्के काम शिल्लक आहे. आरोपात काही तथ्य नाही. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर निश्चितपणे दुरूस्ती केली जाईल.
-एस. सोनेकर, अभियंता
पाटबंधारे विभाग.

Web Title: The 'damages' of farmers due to the 'construction'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.