ब्रह्मपुरीत डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यू, मलेरियाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:28 AM2021-07-29T04:28:39+5:302021-07-29T04:28:39+5:30
पावसाचे पाणी सरळ नाल्यात वाहून जावे म्हणून शहरातील नालेसफाई, पिण्याच्या पाण्यातून कोणतेही संसर्ग होऊ नये म्हणून ब्लिचिंग टाकणे, नाल्यांमध्ये ...
पावसाचे पाणी सरळ नाल्यात वाहून जावे म्हणून शहरातील नालेसफाई, पिण्याच्या पाण्यातून कोणतेही संसर्ग होऊ नये म्हणून ब्लिचिंग टाकणे, नाल्यांमध्ये फवारणी करणे, मोकळ्या जागेतून कचरासफाई आदी कामे नगरपरिषद प्रशासनाला करावे लागतात. मात्र, न. प. प्रशासनाकडून अनेक स्वच्छतेची कामे करण्यात आली नाहीत. दाट वस्ती असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाली आहे. सायंकाळच्या सुमारास व रात्री नागरिकांच्या घरात डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
बॉक्स
डुकरांमुळे शहरात रोगराईची भीती
शहरात मोठ्या प्रमाणात गावठी डुकरांची संख्या वाढली आहे. जुन्या वस्तीत तसेच तलाव, बोडी आदी परिसरात डुकरे कळपाने राहतात. डुकराच्या विष्ठेतून स्पेक्ट्रम नावाचा जंतू निर्माण होतो. तो मानवाच्या आरोग्याला अतिघातक आहे. सर्वत्र डुकरांची विष्ठा पसरली असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
कोट
नगरपरिषद प्रशासनाकडून स्वच्छता, नालेसफाई तसेच डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी फवारणी करण्यात येत आहे. कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यात येत आहे.
-रा. स. ठोंबरे
स्वच्छता निरीक्षक,
नगरपरिषद, ब्रह्मपुरी
280721\img_20210728_100445.jpg
नगरपरिषदेचे प्रवेशद्वार