नाल्यावर बांधकाम करणाऱ्या घरांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:50+5:302021-06-21T04:19:50+5:30
नगर परिषदेचे सर्वेक्षण सुरू बल्लारपूर : तालुक्यात मृग नक्षत्राचा पाऊस दमदार झाल्यामुळे नगर प्रशासनाने बल्लारपूर नगर परिषदेच्या हद्दीत व ...
नगर परिषदेचे सर्वेक्षण सुरू
बल्लारपूर : तालुक्यात मृग नक्षत्राचा पाऊस दमदार झाल्यामुळे नगर प्रशासनाने बल्लारपूर नगर परिषदेच्या हद्दीत व नाल्यावर बांधकाम केलेल्या घरमालकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. घराची काळजी घ्या व उपाययोजना करा, नुकसान झाल्यास नगर परिषद जबाबदार राहणार नाही, असेही सूचित करण्यात आले आहे.
दरवर्षी होणाऱ्या पावसाने घरांची पडझड होतच असते. बल्लारपुरात गणपती वाॅर्ड, संतोषी माता वॉर्ड, बुद्धनगर वॉर्ड, साईबाबा वॉर्ड, गोकुळ नगर वॉर्ड अशा अनेक वॉर्डामधून नाल्यांचा प्रवाह आहे. काही लोकांनी नाल्याच्या काठावरच दोन मजली घरे बांधली आहेत. परंतु काही नाल्यांचे बांधकाम नगर परिषद अभियंत्याच्या निष्काळजीपणामुळे निकृष्ट झाले आहे. नाल्याच्या भिंतीवर सिमेंट प्लास्टर केलेले नाही. घर मालकांनीही बाहेरच्या भिंतीवर प्लास्टर केलेले नाही. यामुळे दमदार पावसाने धोका निर्माण होऊ शकतो. याची नगर पालिकेने दक्षता घेणे गरजेचे आहे.
कोट
शहरात अशा घरांचे सर्व्हे करण्याचे काम आरोग्य विभागाद्वारे सुरू आहे. त्यावर उपाययोजना केल्या जातील. काही घरमालकांना सूचनाही दिल्या आहेत.
- अक्षयकुमार राऊत, अभियंता, योजना विभाग, नगर परिषद बल्लारपूर.