मुख्य रस्त्यावरील ‘त्या’ झाडांपासून धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:26 AM2021-03-28T04:26:24+5:302021-03-28T04:26:24+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर रोडचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्याच्या मध्यभागी असणारी झाडे तशीच ठेवण्यात आली. या मार्गावर मोठ्या ...
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर रोडचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र या रस्त्याच्या मध्यभागी असणारी झाडे तशीच ठेवण्यात आली. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी राहत असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही दिवसांपूर्वी चंद्रपूर-नागपूर महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी सुखकर दिसत आहे. परंतु, चांदा क्लब ग्राऊंड समोरील या महामार्गावर असलेली झाडांची विल्हेवाट रस्त्याचे रुंदीकरण करताना लावण्यात आली नाही. केवळ झाडाला रंग देऊन मोकळे झाले. नागपूर-चंद्रपूर हा महामार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यातच चांदा क्लब ग्राऊंडचा परिसर नेहमी गजबजलेला असतो. मार्ग चांगला असल्याने वाहनचालक वेगाने वाहने पळवत असतात. मात्र रस्त्यावर झाडे असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठा अपघात घडण्यापूर्वीच या झाडांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.