हंगामपूर्व कपाशी लागवड धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:12 AM2019-05-13T00:12:36+5:302019-05-13T00:13:13+5:30

जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या कपाशीची हंगामपूर्व लागवड केल्यास गुलाबी बोंअडळीचा धोका कायम राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी. शिफारस केलेल्या कमी कालावधीच्या पक्व होणाºया बीटी कापूस अथवा सरळ वाणांची जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करण्याचे आवाहन, कृषी विभागाने केले आहे.

Dangerous planting of crop before harvest | हंगामपूर्व कपाशी लागवड धोकादायक

हंगामपूर्व कपाशी लागवड धोकादायक

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना आवाहन : बोंडअळीचा धोका टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या कपाशीची हंगामपूर्व लागवड केल्यास गुलाबी बोंअडळीचा धोका कायम राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी. शिफारस केलेल्या कमी कालावधीच्या पक्व होणाºया बीटी कापूस अथवा सरळ वाणांची जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करण्याचे आवाहन, कृषी विभागाने केले आहे.
सलग दोन वर्षांपासून कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थापनाबाबतच व्यापक मोहीम राबविण्यात आली. गतवर्षी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, केंद्रीय कापूस सनशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रासह इतर कृषी क्षेत्रातील यंत्रणांच्या सहकार्याने २०१८-१९ मध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत झाली. येत्या खरीप हंगामात कापूस पिकांवरील गुलाबी बोंडअळीचा अजीवनक्रम खंडीत करण्याच्या दृष्टीने शेतकºयांनी उपाययोजना तसेच अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यानुसार शेवटच्या वेचणीनंतर शेतातील पºहाटीचे रोटाव्हेटर सारख्या यंत्राद्वारे लहान- लहान तुकडे करुन शेतात गाडणे किंवा शेताबाहेर कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत. शेतातील पालापाचोळा जमा करुन संपूर्ण शेत व बांध स्वच्छ करावा. एप्रिल- मे महिन्यात जमिनीची खोल नांगरणी करावी. त्यामुळे किडीचे जमिनीतील कोष वर येतात व तप्त उन्हामुळे ते नष्ट होतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील.
गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणाची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची व एकाच वेळी लागवड करावी.
पीक लागवडीपासून काढीणीपर्यंत दर आठवड्याला पिकांमधील कीड रोगाचे व पिकांच्या अवस्थेचे सुक्ष्म अवलोकन केल्याने किडीच्या प्रादूभार्वाची तीव्रता पाहून आर्थिक नुकसानाची पातळी गाठली असल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. अधिकाधिक किटकनाशके एकत्र मिसळून फवारणी वा अधिक मात्रेत फवारणी घातक ठरु शकते, ती टाळावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालकांनी यांनी केले.

नॉन बीटी कपाशीची लागवड महत्त्वाची
किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्मितीसाठी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी घेतलेल्या शेतात पुढील हंगामात कापूस लागवड करु नये. पूर्वी तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य लागवड केलेली जमीन कापूस लागवडीसाठी निवडावी, या हंगामात कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रेफ्युजी/ आश्रीत पीक) कपाशीची लागवड करावी. कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धनासाठी मका, चवळी, उडीद, मूंग, झेंडू व एरंडी पिकांची एक ओळ लावावी. तरच गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण करणे शक्य होणार आहे.
तीन महिने कीटकनाशकांचा वापर टाळावा
पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या तीन महिन्यांपर्यंत कीटकनाशकांचा वापर टाळावा. जेणेकरुन मित्र किडीचे संरक्षण होईल. या काळात वनस्पतीजन्य कीटकनाशके, जैव कीटकनाशके, मित्र किडीचा वापर करावा. युरियाचा जास्त वापर टाळावा, जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परीक्षण करुन त्याच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करावा. पिकांच्या ५४ दिवसांत फेरोमन ट्रॅप्सचा वापर प्रतीहेक्टरी पाच याप्रमाणे करावा व पिकातील बदलाची निरीक्षणाची नोंद घ्यावी.

Web Title: Dangerous planting of crop before harvest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस