कोरपना येथे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:55 PM2019-01-16T22:55:27+5:302019-01-16T22:55:46+5:30

बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे दीड महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर बाखर्डीला डावलून अखेर निमणी येथे स्पर्धा घेण्याचे ठरल्याने मुलांना शाळेत पाठविण्यास बाखर्डी येथील पालकांनी नकार दिला आहे.

Dare movement in Korpana | कोरपना येथे धरणे आंदोलन

कोरपना येथे धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देजि.प. अध्यक्ष व बीडीओंचा निषेध : शाळा व्यवस्थापन समिती आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे दीड महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर बाखर्डीला डावलून अखेर निमणी येथे स्पर्धा घेण्याचे ठरल्याने मुलांना शाळेत पाठविण्यास बाखर्डी येथील पालकांनी नकार दिला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत पालक सभेत ठराव पारित केला आहे. दरम्यान, जि.प. अध्यक्ष व कोरपना येथील बीअीओ घोन्सीकर यांच्या विरोधात तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी बुधवारी कोरपना येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
दरवर्षी बीटस्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा संमेलन पंचायत समिती कोरपनाच्या सभागृहात सदस्यांच्या सभेत ठरविले जाते.
मात्र पंचायत समिती सदस्यांच्या सभेच्या ठरावाचा विचार न करता जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या दबावाखाली येऊन संवर्ग विकास अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वमर्जीने निमणी व धानोली गावाची निवड केल्याचा आरोप पं. स. सभापती शाम रणदिवे यांनी केला आहे.
७ जानेवारी २०१९ ला पंचायत समितीची बीटस्तरीय व तालुकास्तरीय संमेलन घेण्याबाबत विशेष सभा पार पडली. सदर सभेमध्ये बीटस्तरीय क्रीडा संमेलन सभागृहाने सवार्नुमते अनुक्रमे वनसडी व बाखर्डी येथे घेण्याचे ठरविले. परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या दबावात येऊन संवर्ग विकास अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वमर्जीने बीटस्तरीय क्रीडा संमेलन निमणी व धानोली (तांडा) येथे ठरविण्यात आल्याने गावकºयांनी रोष व्यक्त केला आहे.
याचा विरोधा करण्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद व पं.स. पदाधिकाºयांनी कोरपना येथे धरणे आंदोलन करुन तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन दिले.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संभा कोवे, चं. जि.म. बँकेचे संचालक विजय बावणे, जि. प. सदस्य शिवचंद्र काळे, कॉंग्रेस नेते उत्तम पेचे, जि.प. सदस्य कल्पना पेचे, विना मालेकर, पं स. सदस्य सिंधू आस्वले, रुपाली तोडासे, बाखर्डीच्या सरपंच अल्का पायपरे, वनसडीच्या सरपंच ललिता गेडाम, सुरेश मालेकर, दिवाकर बोर्डे, मुरलीधर बल्की, रसूल पटेल, रोशन आस्वले, शैलेश लोखंडे आदी उपस्थित होते.

बाखर्डी येथे बीटस्तरीय बाल क्रीडा स्पर्धा घेण्यासंदर्भात केंद्रप्रमुख के. पी. आडे यांनी सांगितले होते. त्यानुसार सर्व तयारी केली असून अखेर दीड महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर निमणी येथे घेण्याचे ठरविले. त्यामुळे आम्ही पालक सभा घेऊन मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. आम्ही बाखर्डी जि.प. शाळेचे पालक व गावकरी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व संवर्ग विकास अधिकारी डॉ. संदीप घोंन्सीकर यांचा निषेध करतो.
- मारोती पारखी
शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, बाखर्डी

Web Title: Dare movement in Korpana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.