एका क्लिकवर मिळणार वीज ग्राहकांना अद्मयावत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:00+5:302021-03-04T04:52:00+5:30

चंद्रपूर : महावितरणच्या ग्राहकांना मीटर रिडींग, वीज बिल, ऑनलाईन बिल,नवीन वीजजोडणीसाठी अर्ज व त्याची सद्यस्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि ...

Up-to-date information will be available to power consumers with a single click | एका क्लिकवर मिळणार वीज ग्राहकांना अद्मयावत माहिती

एका क्लिकवर मिळणार वीज ग्राहकांना अद्मयावत माहिती

Next

चंद्रपूर : महावितरणच्या ग्राहकांना मीटर रिडींग, वीज बिल, ऑनलाईन बिल,नवीन वीजजोडणीसाठी अर्ज व त्याची सद्यस्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे आदीबाबत नेहमीच अनेक तक्रारी असतात. या तक्रारीचा त्वरित निपटारा होऊन ग्राहकांना सुविधा मिळावी यासाठी वीज मंडळाने मोबाईल नोंदणी अभियान राबविले. यामध्ये चंद्रपूर परिमंडळातील तब्बल ६ लाख ५३ हजार २०५ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. त्यामुळे आता त्यांना एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे.

चंद्रपूर परिमंडळांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली मंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व कृषिग्राहक अशा एकूण ६ लाख ५३ हजार २०५ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नोंदणी केली. चंद्रपूर मंडलातील - ३ लाख ८० हजार ७९६ ग्राहक तर गडचिरोली मंडलातील २ लाख ७२ हजार ४०९ ग्राहकांचा समावेश आहे..

बाॅक्स

चंद्रपूर मंडळातील ग्राहक

घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक

४ लाख ९ हजार ४४४ ग्राहक

नोंदणी केलेले ग्राहक

३ लाख ८० हजार ७९६

कृषी ग्राहक

४१ हजार ६३४

मोबाईल नोंदणी ग्राहक

२८ हजार ६६२

Web Title: Up-to-date information will be available to power consumers with a single click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.