दत्तात्रय गुंडावार कृषी पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:20 PM2018-06-20T22:20:40+5:302018-06-20T22:20:54+5:30
कृषी क्षेत्रात मौलिक योगदान देणारे प्रगत शेतकरी दत्तात्रय गुंडावार यांचा राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आयुधनिर्माणी (भद्रावती) : कृषी क्षेत्रात मौलिक योगदान देणारे प्रगत शेतकरी दत्तात्रय गुंडावार यांचा राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात सत्कार करण्यात आला.
यावेळी पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. गुंडावार हे प्रयोगशील शेतकरी म्हणून विदर्भात प्रसिद्ध आहेत. त्यांनी कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करून लक्षणीय उत्पादन घेतले आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असताना गुंडावार यांचे कार्य अन्य शेतकºयांसाठी आशेचा किरण ठरले आहे. यापूर्वी त्यांना शासनाचा कृषी भूषण, कृषीरत्न व शेतीनिष्ठ, शेतकरी, शेतकरी गौरव, कृषीमित्र, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार मिळाला आहे.