ताडोबा बफर क्षेत्रात दिवसभर व्याघ्र सफारीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 08:01 PM2022-11-14T20:01:49+5:302022-11-14T20:02:32+5:30

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारपासून प्रायोगिक तत्त्वावर दिवसभर पर्यटन सफारीला सुरुवात झाली आहे.

Day long tiger safari in Tadoba buffer zone begins | ताडोबा बफर क्षेत्रात दिवसभर व्याघ्र सफारीचा शुभारंभ

ताडोबा बफर क्षेत्रात दिवसभर व्याघ्र सफारीचा शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या दिवशी एका जिप्सीतून चार पर्यटकांनी घेतला आनंद

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारपासून प्रायोगिक तत्त्वावर दिवसभर पर्यटन सफारीला सुरुवात झाली आहे. या जिप्सीत केवळ चार पर्यटक असतील. बफर झोनचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांच्या उपस्थितीत सफारीचा शुभारंभ करण्यात आला.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोअर झोनपाठोपाठ बफर झोनमध्ये दिवसभर सफारीला सुरुवात करण्यात आली. दिवसभर सफारी सुरू करू नये, अशी मागणी जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमी व पर्यावरणवाद्यांनी केली होती. परंतु साेमवारी मोहर्ली बफर झोन अंतर्गत देवाडा-आगरझरी, जुनोना-अडेगाव या मार्गाने दिवसभर सफारीचा शुभारंभ झाला. ताडोबा कोअर झोनमध्ये एका दिवसाला तीन जिप्सी दिवसभरासाठी सोडण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या सफारीचे दिवसभराचे शुल्क ४५ हजार रुपये आहे.

Web Title: Day long tiger safari in Tadoba buffer zone begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.