चंद्रपूर जिल्ह्यात बिबट मृतावस्थेत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:55 AM2019-09-14T11:55:07+5:302019-09-14T11:55:27+5:30
तळोधी वनपरिक्षेत्रांतंर्गत येणाऱ्या वाढोणा येथे बिबट मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर) : तळोधी वनपरिक्षेत्रांतंर्गत येणाऱ्या वाढोणा येथे बिबट मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
या नर बिबटयाचे वय ४ वर्ष आहे. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी आभिलाशा सोनटक्के यांनी ताफ्यासह घटनास्थळाला भेट दिली. अधिक चौकशी केली आसता बिबटयाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळून आले. या बिबटयाचे सावरगाव रोपवाटिकेत डाँ.गिरीष गभणे व शिरिष रामटेके यांनी शवविच्छेदन केले. या बिबटयाचा मृत्यू आजाराने झाला असल्याची माहिती गभणे यांनी दिली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी दिली. बिबटयाच्या अवयवांचे नमुणे घेण्यात आले असून त्यांची फाँरेंसिक लॅबमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. घटनास्थळी सहायक वनसंरक्षक आर.एम. वाकडे यांनीही भेट दिली आहे.