चंद्रपुरातील जीवघेणी वाहतूक सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:24 AM2021-02-15T04:24:49+5:302021-02-15T04:24:49+5:30
चंद्रपूर : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. प्रजासत्ताक दिनी चंद्रपूर-नागपूर रोडवर स्टंट करणाऱ्या युवकांनी दुचाकीचालकाला जखमी ...
चंद्रपूर : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. प्रजासत्ताक दिनी चंद्रपूर-नागपूर रोडवर स्टंट करणाऱ्या युवकांनी दुचाकीचालकाला जखमी केले. त्यानंतर वाहतूक तसेच पोलीस प्रशासन सतर्क झाले. मात्र आता पुन्हा तीच अवस्था बघायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याकडे विशेष लक्ष देऊन भरधाव तसेच स्टंटबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
चंद्रपूर शहरात सतत घडणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे. पोलीस व आरटीओ विभागाकडून वाहतूक सप्ताह पाळण्यात आला. मात्र या सप्ताहाच्या काळातही अनेक चौकात वाहतूक विस्कळीत होताना दिसली. त्यामुळे ठोस कारवाई करून वाहतूक व्यवस्था रुळावर आणणे गरजेचे आहे.
बाॅक्स
अनेक चौकातील सिग्नल नियमित सुरू राहत नाही. तर अनेक चौकात वाहतूक शिपाई राहत नाही. त्यामुळे याचा फायदा घेत युवक भरधाव वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. यावर प्रतिबंध घालण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
बाॅक्स
चंद्रपूर शहरातील महत्वाचे ठिकाण असलेल्या जटपुरा गेटवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. यातून नागरिकांना अकारण मनस्ताप सहन करावा लागते. अर्धा किलोमीटर पर्यंत वाहतूक तुंबलेली असते. कस्तुरबा गांधी मार्गावर अवजड वाहनांना बंदी असतानाही अनेक वाहनधारक या मार्गावर अवजड वाहनांना घालतात. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते.