सहा बकऱ्यांसह गाईचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:33 PM2018-04-27T23:33:10+5:302018-04-27T23:33:24+5:30

बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथील शेतातील गोठ्याला भीषण आग लागल्याने सहा बकऱ्या, एक गाय आणि दोन कोंबड्याचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली.

The death of the cow with six goats | सहा बकऱ्यांसह गाईचा होरपळून मृत्यू

सहा बकऱ्यांसह गाईचा होरपळून मृत्यू

Next
ठळक मुद्देकोर्टीमक्ता येथील घटना : शेतातील गोठ्याला भीषण आग

लोकमत न्यूज नेटवर्क
येनबोडी : बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथील शेतातील गोठ्याला भीषण आग लागल्याने सहा बकऱ्या, एक गाय आणि दोन कोंबड्याचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. या आगीमुळे चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज गावकऱ्यांनी वर्तविला आहे.
कोर्टीमक्ता येथील श्रीकांत रामचंद्र बुद्धलवार यांनी शेतात गोठा बांधला आहे. त्यांची शेती ओलिताखाली असून विविध प्रकारची पिके घेतली जातात. राजू रामचंद्र बुद्धलवार हे शेतीची देखभाल करतात. शेतीसाठी सालगडीही ठेवण्यात आला आहे. शेताच गोठा असल्याने त्यामध्ये शेतीउपयोगी साहित्य तसेच जनावरे ठेवण्यात आली होती. शेतामध्ये काम करीत असताना गोठ्याला अचानक आग लागल्याचे दृश्य सालगड्याला दिसले. त्यांनी आरडाओरड करीत गोठ्याकडे धाव घेतली. गोठ्यात जनावरे बांधून ठेवली होती. आगीच्या ज्वाला पसरताच काही जनावरे दावे तोडून बाहेर निघाले. मात्र सहा बकºया, एक गाय आणि दोन कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. शेतीसाठी ठेवण्यात आलेले सर्व साहित्य जळून खाक झाले. पंचायत समितीचे माजी सभापती राजू बुद्धलवार यांना आगीची माहिती देण्यात आली. पण, तोपर्यंत सर्व साहित्य जळाले होते.

Web Title: The death of the cow with six goats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.