‘व्हेंटिलेटर’अभावी बाधिताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:27 AM2021-04-17T04:27:44+5:302021-04-17T04:27:44+5:30
शहरातील स्वावलंबी नगर परिसरातील एक व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली. कुटुंबीयांनी दुर्गापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतरही ...
शहरातील स्वावलंबी नगर परिसरातील एक व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली. कुटुंबीयांनी दुर्गापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती. त्यामुळे डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. लगेच नातेवाईकांनी ऑटोने सामान्य रुग्णालय गाठले. मात्र, तिथेही व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. लगेच अन्य खासगी रुग्णालयात धाव घेतली. तब्बल पाच तास शहरातील अन्य खासगी रुग्णालयात भटकंती करूनही व्हेंटिलेटर न मिळाल्याने बाधिताचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर रुग्णाची तपासणी केली नाही. खाट उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्ण दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मृताच्या कुटुुंबीयांनी केला आहे.