वीज तारांच्या स्पर्शाने तीन जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:26 AM2021-04-13T04:26:56+5:302021-04-13T04:26:56+5:30

विरुर स्टे : राजुरा तालुक्यातील केळझर येथे रविवारी जिवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने दोन बैल व एका गाईचा मृत्यू ...

Death of three animals by touch of power lines | वीज तारांच्या स्पर्शाने तीन जनावरांचा मृत्यू

वीज तारांच्या स्पर्शाने तीन जनावरांचा मृत्यू

Next

विरुर स्टे : राजुरा तालुक्यातील केळझर येथे रविवारी जिवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने दोन बैल व एका गाईचा मृत्यू झाला. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

राजुरा तालुक्यातील केळझर येथे नाल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन जनावरांना अचानक जिवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत देवराव भोंगळे यांच्या मालकीचा एक बैल, बालाजी टोंगे यांची एक गाय तर प्रभाकर मडावी यांच्या मालकीचा एक बैल मृत्युमुखी पडला. यात जवळपास एक लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी अचानक वादळाला सुरुवात झाली. त्यामुळे वीज खांबावरील जिवंत वीज तारा तुटून खाली पडल्या. रविवारी केळझर येथील जनावरे पाणी पिण्यासाठी गेले असता तीन जनावरांना पडून असलेल्या जिवंत वीज तारांचा स्पर्श झाला.

Web Title: Death of three animals by touch of power lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.