कोरोनाबाधितांचा मृत्यूदरही आता घसरणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:30 AM2021-05-20T04:30:28+5:302021-05-20T04:30:28+5:30

जिल्ह्यात २४ तासांत ११८० जणांनी कोरोनावर मात, तर ६४१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७९ ...

The death toll from coronary heart disease has dropped | कोरोनाबाधितांचा मृत्यूदरही आता घसरणीला

कोरोनाबाधितांचा मृत्यूदरही आता घसरणीला

googlenewsNext

जिल्ह्यात २४ तासांत ११८० जणांनी कोरोनावर मात, तर ६४१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७९ हजार १५० वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७० हजार १५ झाली आहे. सध्या ७ हजार ८२१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ४२ हजार ९३७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ६० हजार ३२७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १३१४ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १२१७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३५, यवतमाळ ४४, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत: व कुटुंबाची काळजी घ्यावी, कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

असे आहेत मृत

बुधवारी मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील इंदिरानगर येथील ८९ वर्षीय महिला, विद्यानगर वार्ड येथील ५९ वर्षीय पुरुष, ४३, ६३ व ७५ वर्षीय पुरुष, ८० वर्षीय महिला, घुग्घुस येथील ४४ वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील टेंबूरवाही येथील ५५ वर्षीय महिला, सिंदेवाही तालुक्यातील ४१ वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील ३० वर्षीय महिला, कोठारी येथील ६० वर्षीय महिला, वरोरा तालुक्यातील उमरी येथील ६७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तालुकानिहाय

चंद्रपूर मनपा क्षेत्र १६९

चंद्रपूर तालुका ३१

बल्लारपूर ७१

भद्रावती ७६

ब्रह्मपुरी ०८

नागभीड २४

सिंदेवाही २७

मूल २८

सावली १७

पोंभुर्णा १५

गोंडपिपरी १६

राजुरा ५४

चिमुर ०४

वरोरा ३४

कोरपना ४५

जिवती १४

इतर ०८

Web Title: The death toll from coronary heart disease has dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.