लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवा, ग्रामीण भागात अधिकाऱ्यांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:11+5:302021-05-31T04:21:11+5:30
चंद्रपूर : कोराना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. मात्र लसीकरणासंदर्भात ग्रामीण ...
चंद्रपूर : कोराना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. मात्र लसीकरणासंदर्भात ग्रामीण तसेच दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात अफवा असल्यामुळे बहुतांशजण लसीकरण करण्याकडे पाठ फिरवित आहे. दरम्यान, टार्गेट पूर्ण करण्यासाठी काही तालुक्यांत अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यांसह काही शहरी भागामध्येही लसीकरणाबाबत बऱ्याचशा अफवा आहे. अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितांमध्येच अधिक प्रमाणात तर्कवितर्क काढले जात असल्याचे चित्र आहे. विशेषत: लसीकरणानंतर मृत्यू होताे, निपुत्रिक होते, नपुंसकता येत असल्याच्याही मोठ्या प्रमाणात अफवा आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागात लसीकरणाची टक्केवारी वाढण्यासाठी अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. विशेषत: जिवतीमध्ये सर्वात कमी लसीकरण झाले असून सर्वाधिक लसीकरण भद्रावती तालुक्यात झाले आहे.
बाॅक्स
आतापर्यंत झालेले लसीकरण-
आरोग्य कर्मचारी -
फ्रंटलाई वर्कर्स-
ज्येष्ठ नागरिक-
४५ ते ६० वयोगट -
१८ ते ४४ -
पहिला डोस
दुसरा डोस
एकही डोस न घेतलेले
बाॅक्स
काय आहेत अफवा...
नपुंसकता येईल
कोरोना संकट डोक्यावर असतानाही काही नागरिकांमध्ये लसीकरणामुळे नपुंसकता येईल, अशी भीती आहे. विशेषत: गावा-गावात यावर उघडपणे तरुणांमध्ये चर्चाही होताना दिसून येत आहे.
बाॅक्स
अकाली मृत्यू
कोरोना लस घेतल्यामुळे अकाली मृत्यू होतो, ही अफवाही मोठ्या प्रमाणात पसरविली जात आहे. त्यामुळे कोरोना टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर लावायचे, मात्र लस घ्यायची नाही, असा पवित्राही अनेकांनी घेतला आहे.
बाॅक्स
निपुत्रिक होण्याची भीती
लसीकरणामुळे निपुत्रिक होण्याची भीती अनेकांना आहे, अशी अफवाही गावा-गावात पसरविली जात आहे. विशेषत: सुशिक्षितांमध्येही याबाबत सावधता बाळगली जात आहे. विवाहइच्छुक तसेच ज्यांचे नुकतेच विवाह झाले आहेत, असेही काही जण लसीकरण करण्यासाठी उदासीन असून ही अफवाही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
बाॅक्स कोट
गावकरी संभ्रमात
कोरोना संकटामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. असे असतानाही गावा-गावात लसीकरणाबाबत अफवांचा पाऊस पडत आहे. या अफवांमुळे नागरिक लसीकरण करून घेण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
- आशा उरकुडे
सरपंच, गोवरी
कोट
आमच्या गावातही अशा प्रकारच्या अनेक अफवा होत्या. आम्ही जनजागृती करून लसीकरण करून घेण्याबाबत नागरिकांना सांगत आहोत. आता काही नागरिक लसीकरणासाठी तयार होत आहेत.
- सरपंच
कोट
अधिकारी म्हणतात.......
ग्रामीण भागामध्ये लसीकरणासंदर्भात काही प्रमाणात अफवा पसरविल्या जात आहेत. नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोना महामारीच्या या दिवसांमध्ये प्रत्येकाने लस टोचून घ्यावी.
- संदीप गेडाम
लसीकरण अधिकारी, चंद्रपूर