युवकाचा अपघातात मृत्यू; दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:31 AM2021-08-19T04:31:47+5:302021-08-19T04:31:47+5:30

उत्तम तायडे हा युवक मोटारसायकलने मित्रासह माणिकगड गेट कडून येत होता. विरुद्ध दिशेने ट्रक येणाऱ्या एचएच ३४ एबी १३९१ ...

Death of a youth in an accident; The marriage took place two months ago | युवकाचा अपघातात मृत्यू; दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

युवकाचा अपघातात मृत्यू; दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

Next

उत्तम तायडे हा युवक मोटारसायकलने मित्रासह माणिकगड गेट कडून येत होता. विरुद्ध दिशेने ट्रक येणाऱ्या एचएच ३४ एबी १३९१ क्रमांकाच्या ट्रक व दुचाकीमध्ये धडक झाली. यामध्ये उत्तम गंभीर जखमी होऊन त्याचे दोन्ही पाय निकामी झाली. मागे बसलेला युवक बाजूला पडल्याने तो थोडक्यात बचावला. उत्तमला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेले असता, डॉक्टरांनी त्याला नागपूरला हलविण्यास सांगितले. नागपूर येथे घेऊन जात असताना, रस्त्यातच उत्तमची प्राणज्योत मालवली. दोन महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. सुखी संसार सुरू असताना काळाने घात केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम संथगतीने

माणिकगड गेट ते पेट्रोल पंप चौक या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. मागील सहा महिन्यांपासून रस्त्यासंदर्भात अनेक निवेदने देण्यात आली. कामाला तत्काळ सुरू करण्यात यावे, यासाठी नागरिकांकडून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात आले. ढिसाळ नियोजनामुळे एका युवकाला आपला जीव गमवावा लागला.

Web Title: Death of a youth in an accident; The marriage took place two months ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.