शेतमाल दरवाढीचा निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:45 PM2017-12-11T23:45:13+5:302017-12-11T23:45:42+5:30

शेतमालास भाव नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनावर शेतकºयांचे लक्ष लागून आहे.

Decide for an increase in commodity prices | शेतमाल दरवाढीचा निर्णय घ्या

शेतमाल दरवाढीचा निर्णय घ्या

Next
ठळक मुद्देहिवाळी अधिवेशन : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी बोलणार काय?

आॅनलाईन लोकमत
गोवरी : शेतमालास भाव नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनावर शेतकºयांचे लक्ष लागून आहे. मात्र, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी सरकारने शेतमालाच्या दराबाबत चर्चा करून न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले. दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरविले जाते. परंतु, शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चा न करता भ्रष्टाचार व अन्य मुद्यांवर सभागृहाचा वेळ वाया घालविला जातो. मग शेतकºयांनी दाद मागायची कुणाकडे. आतातरी शेतमालाचा दरवाढीवर राजकीय पुढारी चर्चा करुन शेतकºयांना न्याय मिळवून देतील काय? हेच आता बघायचे आहे, असा प्रश्न समाजमनातून विचारला जात आहे.
कृषिप्रधान देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था आज वाईट असताना सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. निसर्गाची अवकृपा आणि शेतकऱ्यांची होत असलेली होरपळ हा शेतकºयांच्या चिंतेचा विषय आहे. शेतकरी शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करतो. परंतु सरकारने शेतमालाला दिलेला दर अतिशय तोकडा आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत असून सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवून न्याय देणे अपेक्षीत आहे. तोकड्या दराने शेतकरी कोलमडून गेला आहे. शेतकरी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागला. कापूस पिकावर केला जाणारा खर्चही मोठा आहे. पण, कापसाला मिळणारा दर अतिशय अल्प आहे. यावर्षी शासनाने कापूस पिकाला चार हजार ३३० रुपये हमीभाव जाहीर केले. खरेतर दिलेला हमीभाव जाहीर करताना शासनाने दहा वेळा विचार करायला पाहिजे होता. इतर पिकांपेक्षा कापसावरील उत्पादन खर्च खूप मोठा आहे. या तोकड्या हमीभावात शेतकºयांनी कापूस पिकांवर केलेला खर्चही भरुन निघत नाही.
हमीभाव जाहीर करताना कापूस उत्पादनावर होणाºया खर्चाचा शासनाने अभ्यास करायला हवा होता. परंतु तसा अभ्यासपूर्ण निर्णय न घेता दरवर्षीप्रमाणे यंदाही तोकडा हमीभाव जाहीर करुन प्रशासन मोकळे झाले. शेतकऱ्यांची आज केविलवाणी अवस्था झाली आहे. त्यांच्या प्रश्नावर कुणीही राजकीय नेते रान उठविताना दिसत नाही. निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या काळजातून बोलणारे राजकीय पुढारी गेले कुठे? असा संतप्त शेतकऱ्यांचा सवाल आहे. सर्वांनीच शेतकऱ्यांची साथ सोडली आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांच्या आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी शेतात दिवसरात्र राबतात परंतु त्यांचे न्याय हक्क तुडविले जात आहेत.
शेतकऱ्यांचे अच्छ ेदिन तर सोडाच परंतु शेतकऱ्यांच्या दु:खावरही आज फुंकर घालायला कुणी उरला नाही. शेतकºयांनी एकट्यानेच किती काळ संघर्ष करायचा?
शेतकरी दिवसरात्र घडाची काडी करुन शेतात राबतो परंतु त्यांच्या घामाला दाम मिळत नाही. ही या देशातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेतकरी काकुळतीला येऊन मरण पत्करतो आहे. मात्र, शेतकºयांची आर्त हाक कशी कुणाला ऐकू येत नाही? हा प्रश्न आहे. अधिवेशनात शेतकºयांच्या प्रश्नावर सर्व पक्षातील नेत्यांनी आवाज उठवावी, अशी मागणी गावखेड्यांतील शेतकऱ्यांनी केली.
बोंडअळीने हजारो शेतकऱ्यांचे नुकसान; भरपाई देण्याची मागणी
यावर्षी बोंडअळीने कपासीचे पिके उद्ध्वस्त झाले. विविध रोगांनी ग्रासल्याने यावर्षी पांढऱ्यां सोन्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कपासावरील जिल्ह्यातील सर्व शेतकरी हैराण झाले आहेत. नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाने शेतकºयांकडून अर्ज मागविले आहे. परंतु, जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना अर्ज भरणे कठीण झाले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माहिती घेण्यासाठी गेल्यास निराश मनाने परत जाण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा धूसर झाली. यावर्षी कोणत्याच शेतमालाचे भाव वाढले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात कापूस उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या वाढत आहे. यंदा बोंडअळीने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. काही गावांत अजूनही कृषी विभागाचे अधिकारी पोहोचले नाहीत. केवळ आदेश देऊन शेतकºयांची बोळवण करीत आहेत.

Web Title: Decide for an increase in commodity prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.