पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लावण्याचा संकल्प करा

By admin | Published: June 8, 2016 12:46 AM2016-06-08T00:46:49+5:302016-06-08T00:46:49+5:30

प्रत्येकांना प्राण वायुची गरज असून प्राणवायु वृक्षापासून तयार होत असते.

Decide to plant trees to save the environment | पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लावण्याचा संकल्प करा

पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लावण्याचा संकल्प करा

Next

सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन : वनविभागातर्फे पर्यावरण दिन
चंद्रपूर : प्रत्येकांना प्राण वायुची गरज असून प्राणवायु वृक्षापासून तयार होत असते. जास्तीत जास्त वृक्ष लावून दिवसेंदिवस पर्यावरणामध्ये होणाऱ्या बदलाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष लावण्याचा संकल्प सर्वांनी करण्याची गरज असल्याचे मत, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
वनविभागातर्फे रविवारी आयोजित पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वनविभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘वाघांचे साम्राज्य’ या घडीपुस्तिकेचे विमोचन व वृक्षारोपन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जी.पी.गरड, उपसंचालक (बफर) गजेंद्र नरवणे, डॉ. गोपाल मुंदडा, डॉ. मंगेश गुलवाडे व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
१ जुलै रोजी राज्यात दोन कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला असून त्या पेक्षा जास्त वृक्ष लावून महाराष्ट्र राज्य हे देशात पहिले असेल. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वृक्ष लावताना नकारात्मक भूमिका मनात न ठेवता सकारात्मक भूमीका घेऊन वृक्ष जगविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमामध्ये वनविभाग, नवमानव बहुउद्देशिय संस्था, महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटना व चंद्रपूर बचाओ संघर्ष समिती यांच्या वतीने वनविभाग कार्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरामध्ये ४५ जणांनी रक्तदान केले. नवमानव संस्थेचे संस्थापक प्रवीन डाहुले, स्वाती लांडे, संजय खोब्रागडे, रामचंद्र शेंडे, महेश मानकर, आशीस हिवरे, संजय भंडारी व प्रफुल मेश्राम या रक्तदात्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोपाल मुंदडा यांनी केले. यावेळी संघटनांचे प्रतिनिधी व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Decide to plant trees to save the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.