कारागृह पर्यटनस्थळ घोषित करा-जोरगेवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:30 AM2018-10-22T00:30:11+5:302018-10-22T00:32:04+5:30
चंद्रपूर जिल्हा कारागृह ही कैदी बांधवांना ठेवण्याची जागा नसून हा आदिवासी समाजाचा राजवाडा आहे. तो मोकळा करा आणि पर्यटनस्थळ म्हणून घोषित करा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा कारागृह ही कैदी बांधवांना ठेवण्याची जागा नसून हा आदिवासी समाजाचा राजवाडा आहे. तो मोकळा करा आणि पर्यटनस्थळ म्हणून घोषित करा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी केली.
क्रांतीवीर शहीद वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १६० व्या शहीद दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृहात राष्ट्रीय योध्दा क्रांतीवीर शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके समितीच्या वतीने रविवारी श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी दयालाल कन्नाके, विलास मसराम, साईराम मडावी, श्याम गेडाम, विठ्ठल कुमरे, प्रकाश कुमरे, वाघू गेडाम, शशिकला उईके, राधाबाई सिडाम, नरेंद्र मडावी यांची उपस्थिती होती. यावेळी जोरगेवार म्हणाले, आदिवासी समाजाचा मोठा वारसा जिल्ह्याला लाभला आहे. त्यांच्या क्रांतीकारकांचे एकही स्मारक नाही, ही शोकांतिका आहे.