कोविड टेस्ट वाढविल्यानंतरही पॉझिटिव्हीटी दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 05:00 AM2021-05-07T05:00:00+5:302021-05-07T05:00:41+5:30

कोरोना संसर्गाची भयावहता जाणवण्यापूर्वी बरेच नागरिक आजार अंगावरच काढत होते. परंतु, फेब्रुवारी २०२१ च्या अखेरच्या आठवड्यापासून बाधितांची संख्या वाढू लागली. तरीही नागरिक स्वत:हून कोविड चाचणी करण्यास केंद्रात जात नव्हते. याच कालावधीत कुटुंबातील एकाला कोविड बाधा झाली की संपूर्ण कुटुंब आजाराच्या कचाट्यात सापडू लागले. आजार वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्याने अनेकांच्या प्रकृतीत गुंतागुंती निर्माण झाल्या.

Decrease in positivity rate even after increasing covid test | कोविड टेस्ट वाढविल्यानंतरही पॉझिटिव्हीटी दरात घसरण

कोविड टेस्ट वाढविल्यानंतरही पॉझिटिव्हीटी दरात घसरण

Next
ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : मृतांच्या संख्येतील दररोजची भर चिंताजनक

राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मार्च महिन्यात कोरोनाने कहर केल्याने रुग्णसंख्या प्रचंड वाढली. दरम्यान, या कालावधीत जिल्हा प्रशासनाने आरटीपीसीआर व अ‍ँटिजेन चाचण्यांची संख्या झपाट्याने वाढवून  संसर्गाची साखळी तोडणे सुरू केले. परिणामी, आता बाधितांच्या संख्येत घट होऊ लागली. बुधवारी ५ मे रोजी आतापर्यंत सर्वाधिक ५ हजार १८० चाचण्या केल्यानंतर केवळ १३९३ कोविड पॉझिटिव्ह आढळले.  टेस्ट वाढवूनही पॉझिटिव्हिटी दरात  होऊ लागलेली घसरण नागरिकांना मोठा दिलासा देणारी आहे.
कोरोना संसर्गाची भयावहता जाणवण्यापूर्वी बरेच नागरिक आजार अंगावरच काढत होते. परंतु, फेब्रुवारी २०२१ च्या अखेरच्या आठवड्यापासून बाधितांची संख्या वाढू लागली. तरीही नागरिक स्वत:हून कोविड चाचणी करण्यास केंद्रात जात नव्हते. याच कालावधीत कुटुंबातील एकाला कोविड बाधा झाली की संपूर्ण कुटुंब आजाराच्या कचाट्यात सापडू लागले. आजार वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्याने अनेकांच्या प्रकृतीत गुंतागुंती निर्माण झाल्या. सहव्याधी असणाऱ्यांनी वेळीच रुग्णालयात न गेल्याने उपचारादरम्यान मृत्यू वाढू लागले. मार्चपासून जिल्हा आरोग्य यंत्रणेने आरटीपीआर व अ‍ँटिजेन चाचण्यांचा धडाका सुरू केला. चंद्रपूर मनपा क्षेत्र व जिल्ह्यातील ग्रामीण भागात तपासणी केंद्रांची निर्मिती केली. त्यामुळे कोरोनाबाधितांना डिटेक्ट करून गंभीर रुग्णांवर  लगेच उपचार, सौम्य तसेच लक्षणे नसणाऱ्यांना गृहविलगीकरणाच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात याचा चांगला परिणामही दिसून आला. १ एप्रिलपासून बाधित आढळत असले तरी ही संख्या दोन हजारच्या वर जाऊ शकली नाही. सुरुवातीला दोन हजारपासून सुरू झालेल्या चाचण्यांची संख्या ५ मेपर्यंत ५ हजारच्या पुढे गेली. पण, पॉझिटिव्हिटीची संख्या दीड हजारच्या आसपास राहिली. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकाेर पालन केल्यास कोरोनावर मात करण्यास विलंब लागणार नाही, असेच सध्याचे तरी चित्र आहे.

 मृत्यू रोखणे हेच आव्हान

- कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून रूग्ण व संशयितांना लगेच डिटेक्ट करण्याचे आरोग्य यंत्रणेचे पाऊल संसर्ग रोखण्यास उपयुक्त ठरू लागले. चाचणी केल्यानंतर २४ तासात अहवाल आल्यास पॉझिटिव्हीटी दर पुन्हा कमी होऊ शकतो. मात्र, मृत्यू दर रोखण्यास प्रशासनाला अजुनही यश आले नाही. ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेड्सची संख्या वाढविण्यासाठी प्रशासन गतीने कामाला लागले. बेड्सची संख्याही आता वाढू लागली. 
- ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरही उपलब्ध होत आहेत. नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरू झाले. कोविड पेशंट मॅनेजमेंट पाेर्टलमुळे खासगी हॉस्पिटल्सच्या मनमानीला काही प्रमाणात चाप बसला. पालकमंत्री विजय वडेट्टीवार व पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने हे कोविड प्रतिबंधासाठी झटत आहेत. त्यामुळे कोविड रूग्णांसाठी ब-याच आरोग्यसुविधा निर्माण होऊ शकल्या. प्रशासनाच्या या जमेच्याच बाजू आहेत. 

तिसऱ्या लाटेविरूद्ध हवी तयारी
कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी सध्या उभारण्यात येत असलेल्या आरोग्यसुविधा रूग्णांना संजीवनीच देणाºया आहेत. मात्र, ब-याच सुविधा अद्याप कार्यान्वित झाल्या नाहीत. पॉझिटिव्हचे प्रमाण घसरणीला लागले. परंतु, मृतांची संख्या दररोज २० च्या पुढे जात आहे. 
कोरोना विषाणूने स्वत:मध्ये बदल केल्याने संसर्गाचा धोका संपला नाही. केंद्र व राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे. त्यामुळे ही लाट परतवून लावण्यासाठी यंत्रणा सक्षम करून ठेवणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

कोविड चाचण्यांची संख्या कमी होणार नाही. ऑक्सिजनयुक्त बेड्सची संख्या वाढविणे सुरू आहे. महिला रुग्णालय, मनपाचा आसरा, वन अकादमी व तालुका गावपातळीवरील कोविड केअर सेंटरच्या सुविधा वाढविण्यात येत आहेत. तालुकास्थळावरील ऑक्सिजन प्लांटही लवकरच कार्यान्वित होतील. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकाेर पालन केल्यास कोरोनावर निश्चितपणे मात करू.
- अजय गुल्हाने, 
जिल्हाधिकारी, चंद्रपूर

 

Web Title: Decrease in positivity rate even after increasing covid test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.