मामा तलावातील जलसाठ्यात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:25 AM2020-12-24T04:25:51+5:302020-12-24T04:25:51+5:30
जलसाठ्यात घट सिंदेवाही : तालुक्यात माजी मालगुजारी (मामा) तलाव बरेच आहेत. परंतु, मायनरवरील आऊटलेट (मोरी बांधकाम) ची कामे पूर्ण ...
जलसाठ्यात घट
सिंदेवाही : तालुक्यात माजी मालगुजारी (मामा) तलाव बरेच आहेत. परंतु, मायनरवरील आऊटलेट (मोरी बांधकाम) ची कामे पूर्ण करण्यात आली नव्हती. त्यामुळे पावसातील थांबू शकले नाही. हे तलाव शेतकºयांसाठी संजीवनी ठरू शकतात. कंत्राटदाराचे हित लक्षात घेऊन डागडुजी केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत
अनुदान न मिळाल्याने
शेतकरी हैराण
भद्रावती : तालुक्यातील अनेक शेतकºयांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण केले आहे. शासनाने विहिरीसाठी अनुदान जाहीर केले होते. शेतकºयांनी विहिर बांधल्याची कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करूनही अनुदान मिळाले नाही. शेतकºयांनी उधारीवर बांधकामाचे साहित्य विकत घेतले. पं. स. कडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्वच्छता कर्मचारी
पदोन्नतीपासून वंचित
नागभीड : नगर परिषदअंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छता कामगारांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. अहर्ताधारक सफाई कामगारांची पदोन्नती करावी, अशी मागणी महाराष्ट्र सफाई कामगार संघटनेने केली आहे.
कचरा पेट्यांची
स्वच्छता करावी
चिमूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चौकातील कचरा पेट्याही तुंबल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन नगरपंचायतने कचºयाची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कृषिपंपाच्या बिलात
दुरूस्ती करावी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक शेतकºयांना चुकीचे वीज बिल देण्यात आले. काही शेतकºयांच्या कृषिपंप वीज जोडणीची प्रक्रियाही प्रलंबित आहे. यासंदर्भात संबंधित विभागाकडे निवेदन देण्यात आले होते. याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील कृषिपंपधारक शेतकºयांनी केली आहे.
दुर्गापूर मार्गावरील
अतिक्रमण हटवा
चंद्रपूर : येथील निर्माणनगर, तुकूम प्रभाग क्र.१ येथे दुर्गापूर रोडपासून निर्माण नगर रोड, यशोगंगा लॉनपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुने अतिक्रमण वाढले आहे. दुर्गापूर रोडपासून ते निर्माणनगरचा रोड हा ६० फुटाचा आहे. परंतु दोन्ही बाजूच्या रहिवाशांनी यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तो मार्ग अरुंद झाला आहे. पाण्याची पाईपलाईन व नालीकरिता जागा शिल्लक नाही. त्यामुळे या मार्गावरुन वाहनचालकांना वाहण चालविताना अडचण येत आहेत.
विजेची समस्या
सोडविण्याची मागणी
पोंभुर्णा : परिसरात विद्युत ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेऊन देवाडा येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. देवाडा परिसराला लागून अनेक गावे आहेत. या गावांना वीज पुरवठा करताना अनेक अडचणी येतात. विजेचा दाब पुरेसा राहत नाही. त्यामुळे वारंवार पुरवठा खंडित होतो. याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाºयांनी लक्ष द्यावे.
बोटेझरी, कोळसा येथे
मूलभूत सुविधांचा अभाव
चंद्रपूर : शासनाने बोटेझरी व कोळसा या गावांचे २००७ ला भगवानपूर येथे पुर्नवसन केले. मात्र, अजुनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींही येथील समस्या जिल्हा प्रशासनाकडे प्रभावीपणे मांडत नाही. परिणामी, समस्या जैसे-थे आहेत, असा आरोप गावकºयांनी केला आहे.
रिक्त पदांमुळे आरोग्य
सेवेवर अनिष्ट परिणाम
चिमूर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे़ बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे़ यंदा अल्प उत्पन्न झाल्याने शेतकरी हैराण झाला़ कुटुंबाच्या गरजा भागविताना ओढाताण होत आहे़ त्यामुळे आरोग्यासाठी खासगी रुग्णालयात जाणे शक्यच नाही़ त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
गतिरोधकाअभावी
अपघाताची शक्यता
सावली : सावली ते गडचिरोली या मुख्य मार्गावरील चौक परिसरात गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. हा वर्दळीचा मार्ग आहे. खेडी ते चकपिरंजी या रस्त्यावर गतिरोधक नाही. यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. काहींना जीव गमावावा लागला. त्यामुळे बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.