संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:12+5:302021-07-11T04:20:12+5:30
चंद्रपूर : अत्याधुनिक व सर्व सुविधांसह नागपूर मार्गावरील पडोली चौकात आजपासून संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूरकरांच्या सेवेत रुजू झाले ...
चंद्रपूर : अत्याधुनिक व सर्व सुविधांसह नागपूर मार्गावरील पडोली चौकात आजपासून संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूरकरांच्या सेवेत रुजू झाले आहे.
वर्दळीच्या महामार्गावर अपघात घडल्यास तातडीची आरोग्यसेवा म्हणून संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आकस्मिक अपघात केंद्र (टीआरएयुएम सेंटर) येथे उपलब्ध आहे. याशिवाय अस्थिरोग विभाग, मेंदू शस्त्रक्रिया, मुखरोग, दंत चिकित्सा, अतिदक्षता विभाग (आसीयु), स्त्रीरोग आणि प्रसूती विभाग, बालरोग, सामान्य, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेडिसीन विभाग, नाक कान व घसा विभाग, एक्स-रे, पॅथोलॉजी, मेडिकल, रुग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनुभवी स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सची टीम कार्यरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तातडीची आरोग्यसेवा आणि आधुनिक उपचार पद्धतीसाठी संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नेहमीच पुढे राहील, अशी माहिती संचालक डॉ. निखिल सोनकुसळे यांनी दिली.