रोजगारासाठी दीनदयाल ग्रामीण कौशल्य केंद्र उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 01:23 AM2018-11-14T01:23:35+5:302018-11-14T01:23:58+5:30
देशातील ग्रामीण भागातील होतकरू तरूणांमध्ये कौशल्याची भरमार आहे. मात्र त्यांना रोजगाराची प्रत्यक्ष संधी मिळत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम सुरू केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशातील ग्रामीण भागातील होतकरू तरूणांमध्ये कौशल्याची भरमार आहे. मात्र त्यांना रोजगाराची प्रत्यक्ष संधी मिळत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. त्याअनुषंगाने चंद्रपूर येथे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य केंद्राची सुरूवात करण्यात आली. केंद्राच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगार मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
स्थानिक साई पॉलीटेक्निक येथे आयोजित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या यशस्वी प्रशिक्षणार्थींच्या प्रमाणपत्र वितरण सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. सोहळयाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, माजी नगर परिषद अध्यक्ष विजय राऊत, साई पॉलीटेक्निचे संचालक व्हि. एम. येरगुडे, मॅनपॉवर गृपचे हनसन वर्गीस, स्वप्नील बेलेकर आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा जन्मदिवस असल्याने केंद्रातील विद्यार्थ्यांनी केक कापून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी मार्गदर्शन करताना अहीर म्हणाले, ग्रामीण परिवारातील एक युवकाला रोजगार मिळाला तर परिवारासाठी एक मोठा आधारस्तंभ उभा होत असतो, याची जाणीव असल्याने दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कोशल्य योजनेची सुरूवात चंद्रपूरात व्हावी, येथील ग्रामीण तरूणांना याचा लाभ घेता यावा, यासाठी या केंद्राची सुरूवात आपण चंद्रपूरात केली असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सदर प्रशिक्षण मोफत असून हमखास रोजगाराच्या संधी या केंद्राच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे प्रशिक्षण घेत रोजगाराच्या संधी प्राप्त कराव्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शं केले
या प्रशिक्षण केंद्रात १४० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असताना पहिल्या बॅचमधील एकूण ३१ विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाल्याची माहिती यावेळी केंद्रप्रमुखांनी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांना दिली.