श्वानांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी हरीण पाण्याच्या टाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:30 AM2021-02-09T04:30:38+5:302021-02-09T04:30:38+5:30
मेंडकी : अन्नाच्या शोधात गावात आलेल्या हरिणीचा श्वानांनी पाठलाग करताच जिवाच्या आकांताने पळत सुटलेले हरिण नळाच्या टाक्यात पडले. यामध्ये ...
मेंडकी : अन्नाच्या शोधात गावात आलेल्या हरिणीचा श्वानांनी पाठलाग करताच जिवाच्या आकांताने पळत सुटलेले हरिण नळाच्या टाक्यात पडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी त्या टाक्यातून काढून त्या हरणाला जीवदान दिले. ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील नीलज गावात घडली.
सकाळीच्या सुमारास हरीण निलज गावाच्या शिवारात आले. अचानक श्वान मागे लागल्याने सरळ हरीण गावाच्या दिशेने पळत सुटले. जीव वाचविण्याच्या आकांताने पळत सुटलेल्या हरणाने उंच उडी घेताच ते थेट गावातील विजय बाकमवार यांच्या घरातील नळाच्या टाक्यामध्ये पडले. यामध्ये हरीण जखमी झाले. भोपाल बांकमवार, महेश भुते, सुरज धोंगडे, जयदेव बांकमवार व जयराम ढोरे यांनी पाण्याच्या टाकीतून हरणाला बाहेर काढून जीवनदान दिले. ही वार्ता कळताच निलज, रुई, पाचगाव, येथील नागरिकांनी हरणाला बघण्यासाठी गर्दी केली होती. ब्रह्मपुरी उत्तर वनपरीक्षेत्र अधिकारी पुनम ब्राह्मणे यांनी हरणाला ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार करून जंगलात सोडण्यात आले. यावेळी वनरक्षक आर. बी. धुडसे, वनरक्षक आर. डी. बांबोडे वनरक्षक, वनरक्षक शीतल ठाकरे, नितेश मोहुर्ले, श्रीकृष्ण सतिमेश्राम, पिंटू गुरफुडे वनमजूर उपस्थित होते. सदर परिसरात दोन हरीण आल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.