मानहानी करणारीकविता अभ्यासक्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:13 PM2018-10-01T23:13:01+5:302018-10-01T23:13:33+5:30
मुंबई विद्यापिठातील बी. ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासाक्रमात ‘पाणी कस असत’ असा या शिर्षकाखाली असलेल्या कवितेत आदिवासी मुलीची मानहाणी करणाऱ्या अश्लिल शब्दांचा वापर करण्यात आला आहे. मात्र याची शहानिशा न करता मुंबई विद्यापिठाने बी. ए. च्या तिसºया वर्षाच्या अभ्यासक्रमात सदर कविता समाविष्ठ केली आहे. त्यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या असून संबंधित कवी दिनकर मनवर व कुलगुरु व कुलसचिव यांच्यावर अनूसुचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोंडवाना विद्यार्थी संघटनतेर्फे जिल्हाधिकारीमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुंबई विद्यापिठातील बी. ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासाक्रमात ‘पाणी कस असत’ असा या शिर्षकाखाली असलेल्या कवितेत आदिवासी मुलीची मानहाणी करणाऱ्या अश्लिल शब्दांचा वापर करण्यात आला आहे. मात्र याची शहानिशा न करता मुंबई विद्यापिठाने बी. ए. च्या तिसºया वर्षाच्या अभ्यासक्रमात सदर कविता समाविष्ठ केली आहे. त्यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या असून संबंधित कवी दिनकर मनवर व कुलगुरु व कुलसचिव यांच्यावर अनूसुचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोंडवाना विद्यार्थी संघटनतेर्फे जिल्हाधिकारीमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापिठातील अभासक्रमात कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या पुस्तकातील ‘पाणी कस असत’ या कवितेत मुलनिवासी समाजाच्या मुलींविषयी अश्लिल आक्षेपहार्य विटंबना करून एक वाईट मानसिक्ता असलेल्या लेखकाच्या कवितेला मुंबई विद्यापीठात मान्यता दिली. हे कार्य जाणीवपूवर्क करण्यात आले आहे. मुलींविषयी व स्त्रियाविषयी वाईट विचार ठेवणाऱ्या आणि विशिष्ट समाजाच्या मुलींवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या संबंधित कवी दिनकर मनवर, कुलगुरू तसेच कुलसचिव यांच्यावर अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत कलम ३ (१०) तसेच विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात अध्यक्ष प्रा. धीरज शेडमाके, उपाध्यक्ष सारंग, गणपत नैताम, रमेश कुमरे, किुंटू कोटनाके, मनोज आत्राम, गणपत नैताम, रमेश कुमरे आदी उपस्थित होते.