कोविड रुग्णांच्या भोजन व स्वच्छता व्यवस्थेत कसुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:20+5:302021-05-12T04:29:20+5:30
जेवणामध्ये पोषण आहार मिळत नसल्याचे आढळून आले. रुग्णांना आठवड्यातून दोन दिवस अंडी व मांसाहारी आहार पुरविणे आवश्यक असताना ते ...
जेवणामध्ये पोषण आहार मिळत नसल्याचे आढळून आले. रुग्णांना आठवड्यातून दोन दिवस अंडी व मांसाहारी आहार पुरविणे आवश्यक असताना ते मिळत नसल्याचे आढळून आले आहे.
येथील मुख्य पुरवठादाराने सहपुरवठादार तयार करून प्रतिदिन २०० रुपयांचे भोजन १५० रुपयात पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. कोविड काळात सेवेच्या नावाखाली नफेखोरी कमाविण्याच्या वृत्तीतून सदर प्रकार सुरू असल्याचे निदर्शनात येत असल्याचे आमदार धाेटे यांनी म्हटले आहे. ही बाब माणुसकीला काळिमा फासणारी असून असे प्रकार घडणे हे निंदनीय आहे. रुग्णांना पोषण आहार पुरविणे संबंधित पुरवठादाराची जबाबदारी असतानासुद्धा याकडे पुरवठादार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, अशा शब्दात आ. धोटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोविड केअर सेंटरमधील भोजन व्यवस्थेबाबत चौकशी करून रुग्णांना प्रोटिनयुक्त पोषण आहार पुरविणे तसेच कोविड सेंटरमध्ये स्वच्छता ठेवण्याबाबतच्या सूचना संबधितांना देण्यात याव्यात, असेही आमदार धोटे यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.