देयके रखडल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 05:00 AM2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:01:42+5:30
ग्रामीण भागात अनेक लाभार्थ्यांना शबरी आवास योजना, प्रंतप्रधान घरकुल योजना, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांनी आपले जुने घर पाडुन नवीन बांधकामाला सुरवात केली. दरम्यान, कोरोनाच्या पादूर्भावामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली. या कालावधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव (भो): ब्रम्हपुरी तालुक्यातील झीलबोडी परीसरात शबरी, आवास, पंतप्रधान घरकुल योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत शासनाकडून निधी अद्यापही मिळाला नसल्याने लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे.
ग्रामीण भागात अनेक लाभार्थ्यांना शबरी आवास योजना, प्रंतप्रधान घरकुल योजना, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांनी आपले जुने घर पाडुन नवीन बांधकामाला सुरवात केली. दरम्यान, कोरोनाच्या पादूर्भावामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली. या कालावधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला. त्यामुळे बांधकामा सुरु करण्यात आले. मात्र कोरोनामुळे सध्या घरकुलांचे काम अर्धवट आहेत. त्यातच दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही दुसरा हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांची चिंता वाढली असून त्यांना त्वरित अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य उर्मिला धोटे यांनी केली आहे.