राज्याचा कर चुकवून दिल्लीची रुग्णवाहीका धावायची चंद्रपुरात

By परिमल डोहणे | Published: September 15, 2024 05:24 PM2024-09-15T17:24:12+5:302024-09-15T17:24:46+5:30

वेकोलिचा प्रताप : आरटीओने केली रुग्णवाहीका जप्त

Delhi ambulance used to run in Chandrapur after evading state tax | राज्याचा कर चुकवून दिल्लीची रुग्णवाहीका धावायची चंद्रपुरात

राज्याचा कर चुकवून दिल्लीची रुग्णवाहीका धावायची चंद्रपुरात

चंद्रपूर: परऱ्यातील वाहन चालवायचे असेल तर त्या राज्याचा कर भरणे आवश्यक असते. मात्र वेकोलीने दिल्लीच्या एका कंपनीची कंत्राट करून रुग्णवाहिका सुरू केली. चंद्रपुरात ही रुग्णवाहिका धावन्यासाठी राज्याचा कर भरणे आवश्यक होते. मात्र वेकोलीने कंत्राट दिलेल्या कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. ही बाब प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी ती रुग्णवाहिका जप्त करून थकीत कर भरण्याचा नोटीस बजावली आहे. या कारवाईने अनधिकृतरीत्या धावणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. 

वेकोलीला सीएसआर फंडातून स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे क्रमप्राप्त असते. त्या अनुषंगाने विकोलिने रुग्णवाहिका सेवा सुरू केली. मात्र यासाठी वेकोलीने स्थानिकांना डावलून दिल्लीच्या पी एस फिनरल अँड ऍम्ब्युलन्स प्रा. लि या कंपनीची करार करून   एच आर 69 ई 5598 क्रमांकाची रुग्णवहीका सुरु केली. 

मार्च 2023 पासून ही रुग्णवाहिका चंद्रपुरात धावत होती. नियमानुसार याबत आरटीओ यांना माहिती देऊन महाराष्ट्र वापर कर भरणे गरजेचे होते. मात्र वेकोलीने याकडे दुर्लक्ष केले. ही बाब आरटीओच्या पथकाच्या लक्षात येतात त्यांनी रुग्णवाहिका क्रमांक  एच आर 69 ई 5598 ची पाहणी केली यावेळी मार्च 2023  पासूनचा 37 हजार 800 रुपयांचा कर थकीत आढळून आला. त्यामुळे आरटीओने ती रुग्णवाहीका जप्त करून थकित कर त्वरित भरण्याचे आदेश पत्राद्वारे दिले आहेत. 

बॉक्स 

रुग्णवाहिकेचा व्यावसायिक वापर

महाराष्ट्र शासनाच्या 21 जुले 2021 च्या अधिसूचनेनुसार अनु क्रमांक 7 नुसार रुग्णवाहिका संवर्गातील वाहनांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर  उपयोग करणाऱ्या वाहणास कर सवलत आहे. परंतु सदर रुग्णवाहिकेचा व्यवसायिक वापर होत असल्याचे आरटीओच्या निदर्शनास आले. त्यामुळे या वाहनाला राज्य शासनाचा कर भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे आरटीओने हे वाहन जप्त करून कर भरण्याचा नोटीस बजावली आहे.

 परराज्यातील वाहनाला त्या राज्यातील स्थानिक कर भरणे अनिवार्य असते. सदर रुग्णवाहीकेचा व्यावसायिक वापर सुरु होता. तसेच मार्च 2023 पासून महाराष्ट्र वापर कर थकीत होता. त्यामुळे त्या वाहणाला कर भरण्याबाबतची नोटीस बजावली. तसेच महाराष्ट्र टॅक्स तपासूनच वाहने भाडेतत्त्वावर घेण्याबाबत वेकोलीला पत्र दिले आहे. इतर ज्या वाहनाचा कर थकीत असेल त्यांनी तो लगेच भरून घ्यावा. अन्यथा कारवाही केली जाईल. 
- किरण मोरे प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर

Web Title: Delhi ambulance used to run in Chandrapur after evading state tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.