प्रत्येक गावात बीएसएनएलची सेवा पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:30 AM2021-08-22T04:30:44+5:302021-08-22T04:30:44+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक गावात बीएसएनएल मोबाइलची सेवा आणि सुविधा पोहोचवावी तसेच पावसाळ्यात बीएसएनएलची दूरध्वनी व मोबाइल सेवा विस्कळीत ...
चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक गावात बीएसएनएल मोबाइलची सेवा आणि सुविधा पोहोचवावी तसेच पावसाळ्यात बीएसएनएलची दूरध्वनी व मोबाइल सेवा विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्या व शैक्षणिक सत्र, बहुतांश शासकीय कामे, नोकरीचे अर्ज आदी कामे ऑनलाइन झाल्याने ग्रामीण भागात ब्रॉडब्रँड, थ्रीजी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, जिवती तालुक्यातील कुंभेझरी व कोडेपूर तसेच चिमूर तालुक्यातील साठगाव येथे टॉवर लावण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दूरसंचार सल्लागार समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
या वेळी बीएसएनएलचे वरिष्ठ महाप्रबंधक एस. के. शाहू, पंकज भुजबळ, दीपक कांबळे, विश्वास काळे, दिनेश जयस्वाल, राजेश शेंडे, सचिन सरोदे, मिलिंद नागराळे, दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य भास्कर कावळे, ॲड. शाकीर बशीर मलिक शेख, संदीप काळे, दीपक कत्रोजवार, प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.
या वेळी खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बीएसएनएल विभागाचा आढावा घेतला. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, राजुरा येथे वायफाय शहर करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच निधी प्राप्त होऊन या शहरामध्ये ही सेवा सुरू होणार आहे. पूर्वी बीएसएनएल घराघरांत प्रत्येकाकडे वापरले जात होते. मात्र आता त्याचा वापर कमी होत आहे. भविष्यात इतिहासजमा न होता येत्या काळात बीएसएनएलचे जुने दिवस परत आणण्याकरिता काम करा, अशा सूचना खासदार धानोरकारांनी अधिकाऱ्यांना दिल्या.