शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना वेळेत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:00 AM2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:01:18+5:30
शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचताना आर्थिक लाभाचा फायदा विलंबाने मिळणे हा मोठा अडथळा असल्याचे शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे कृषी विभाग व अन्य विभागांनी शेतकऱ्यांच्या योजना राबविताना वेळेचे बंधन पाळावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. सोमवारी प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत दोन तास चर्चा केल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचताना आर्थिक लाभाचा फायदा विलंबाने मिळणे हा मोठा अडथळा असल्याचे शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे कृषी विभाग व अन्य विभागांनी शेतकऱ्यांच्या योजना राबविताना वेळेचे बंधन पाळावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. सोमवारी प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत दोन तास चर्चा केल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्रे मनोहरे, उपविभागीय कृषी अधिकारी दिगंबर तपासकर, वरोऱ्यांचे उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, कृषी अधिकारी गणेश मादेवार, गटाचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. या सभेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मंजूर गटांना गटशेतीमधून देय अनुदानाच्या १५ टक्क्यांपर्यंत अनुदान गटांना तात्काळ वितरित करण्याच्या सूचना दिल्या. ज्या गटांचे सविस्तर प्रकल्प आराखडे मंजूर नाहीत अशा गटांच्या संबंधित उपविभागीय कृषी अधिकाºयांनी दोन दिवसात आढावा घेऊन सुधारीत सविस्तर प्रकल्प आराखडे जिल्हास्तरीय समितीला सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
या बैठकीला युवक बिरादरी बहुउद्देशीय शेतकरी बचतगट, अन्नपुर्णा स्वयंसहाय्य गिरगाव, अन्नपुर्णा स्वयंसहाय्य, युवक बिरादरी शेतकरी गट मूल, राजल्ला वाभीटकर, शेतकरी मित्र बचतगट खिरडी, सुधाकर जिवतोडे, किसानपुत्र शेतकरी स्वयंसहाय्य गट नंदोरी, नरेंद्र जिवतोडे, आबाजी ढुमणे, कृषी मित्र बचतगट सिंदी, पलिंद्र्र सातपुते, उमळपेठ फॉर्मर्स उधळपेठ, तात्यासाहेब मत्ते, वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामीण विकास गट कान्सा भाऊजी जाबोर, अन्नदाता शेतकरी बचतगट सुब्बई, श्री गुरूदेव ग्रामीण विकास संस्था नेदमापेठ, चिमूर फॉर्मस कंपणी चिमूर, संदीप कुटेमाटे, उन्नती शेतकरी पुरूष बचतगट पिपरी, हेमंत बोबडे, उन्नती शेतकरी पुरूष बचतगट, पिपरी, ए. एस. धनविजय, संजय एस येनुरकर तसेच गडिसुर्ला येथील कृषी विकास शेतकरी बचतगटाचे सदस्य व शेतकरी उपस्थित होते.
कर्जासाठी प्रस्ताव सादर करा
ज्या शेती गटांनी कर्ज प्रकरणासाठी बँकेत प्रस्ताव सादर केला. अशा गटांनी माहिती कार्यालयाला कळवावे. त्या संबंधात बँकांचा लवकरच आढावा घेण्यात येईल. विभागीय कृषी सहसंचालकांनी गटांना सांगितलेल्या बाबी आराखड्यात घ्यावे व गरज वाटल्यास सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूचना उपस्थितांना दिल्या. गटांना आर्थिक विकासाकडे नेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्णत: मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी यावेळी दिले.