गरजूंपर्यंत धान्य, भोजन पोहचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:00+5:30
शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून पुरवठा केला जात आहे. मात्र, यातून गरजू कदापि सुटू नये, याची दक्षता घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. मंगळवारी नायब तहसीलदार कार्यालयात गरजूंना धान्य वाटप करताना ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाकडाऊन केल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून पुरवठा केला जात आहे. मात्र, यातून गरजू कदापि सुटू नये, याची दक्षता घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. मंगळवारी नायब तहसीलदार कार्यालयात गरजूंना धान्य वाटप करताना ते बोलत होते.
ज्या व्यक्तींकडे राशनकार्ड नाही, अशा जिल्हातील ४० हजार गरजूंना धान्य पुरवठा करण्यात येणार आहे. मंगळवारी ११ व्यक्तींना १० किलो तांदूळ, १ किलो खाद्य तेल, १ किलो डाळ २०० ग्राम मिरची, १ किलो मीठ, हळद आदी वस्तुंचा या किटमध्ये समावेश आहे. शहर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घरपोच किट देण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश देवतळे, घुग्घुस शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजुरेड्डी, उपविभागीय अधिकारी गव्हाड, तहसीलदार नीलेश गौंड, नायब तहसीलदार सतीश साळवे, तलाठी पिल्लई, ठाणेदार राहुल गांगुर्डे, लक्ष्मण सादलावार, सय्यद अनवर, सरफराज पटेल आदी उपस्थित होते.