सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले धान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:54+5:302021-09-02T04:59:54+5:30
पूर्वी महिला चूल आणि मूल इथपर्यंतच सीमित होत्या, परंतु प्रभाग संघाच्या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक देवाणघेवाण करीत असल्याचे बघून ...
पूर्वी महिला चूल आणि मूल इथपर्यंतच सीमित होत्या, परंतु प्रभाग संघाच्या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक देवाणघेवाण करीत असल्याचे बघून समाधान व्यक्त केले. महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री ऑनलाईन पद्धतीने करावी, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
विविध उपक्रमांचे प्रदर्शन डेमो स्वरूपात स्टॉल लावण्यात आलेले होते. त्या स्टॉलवरील प्रत्येक वस्तूची पाहणी डॉ. मित्ताली सेठी यांनी करून महिलांच्या कामांची प्रशंसा केली. यावेळी सेंद्रिय शेती करीत असलेल्या शेतकरी महिलांना स्कोप सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे, पं. स. सदस्य गंगाधर मडावी, तसेच संघाच्या अध्यक्ष ललिताताई पोरटे, सचिव शीलाताई वागदरकर, कोषाध्यक्ष भाग्यश्री देठे, जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व कर्मचारी व संघाचे सदस्य उपस्थित होते.
010921\img-20210901-wa0011.jpg
नवेगाव मोरे येथील महिला प्रभाग संघाच्या स्टाॅलला डॉ.मिताली सेठी यांनी दिली भेट