पाठ्यपुस्तके शाळेपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:50+5:302021-06-24T04:19:50+5:30
म. रा. प्राथमिक शिक्षक संघाची मागणी सिंदेवाही : शालेय पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी शासन निर्देशाप्रमाणे प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविण्यात यावीत, ...
म. रा. प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
सिंदेवाही : शालेय पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी शासन निर्देशाप्रमाणे प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचविण्यात यावीत, अशी मागणी म. रा. प्राथमिक शिक्षक संघाने पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळाने तालुका अध्यक्ष डेकेश्वर पर्वते यांच्या नेतृत्त्वात गटशिक्षणाधिकारी संजय पालवे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. पाठ्यपुस्तके शाळेपर्यंत पोहोचविण्याचे शासन निर्देश व अनुदान असूनही तशी कार्यवाही होत नाही. त्यामुळे शिक्षकांना नाहक त्रास होतो. विद्यार्थ्यांनाही योग्यवेळी पुस्तके मिळत नाहीत. ही गंभीर बाब संघटनेने प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी यावेळी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी संघटनेने विविध समस्यांवर चर्चा केली. सातव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीची पडताळणी करण्याकरिता विशेष शिबिर आयोजित करण्याची संघटनेची मागणीही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष पवन मोहुर्ले, सल्लागार राजेश निनावे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.